कोल्हापूर-उस्मानाबाद-बीदर रेल्वे बंद न करता ती पुढे हैद्राबाद पर्यंत वाढवावी-ओमराजे निंबाळकरांची मागणी

उस्मानाबाद: कोल्हापूर-उस्मानाबाद-बीदर रेल्वे बंद न करता ती पुढे हैद्राबाद पर्यंत वाढवावी, अशी मागणी खा.ओमराजे निंबाळकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयुष गोयल, व रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्याकडे संसद भवन दिल्ली येथे भेट घेऊन केली आहे.

यावेळेस खासदार राजेनिंबाळकर यांच्यासोबत भाजपाचे अविनाश कोळी उपस्थित होते.
गेल्या कांही दिवसापासून कोल्हापूर बीदर गाडी नंबर ११४१६ ही गाडी उस्मानाबाद-लातूर मार्गे आठवड्यातून एक वेळेस सोडली जाते. सदर गाडी नुकसानीत चालत असल्याबद्दल रेल्वे विभाग सदर गाडी बंद करीत आहे.

कोल्हापूर-बिदर या रेल्वेमुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटक जवळच्या मार्गाने जोडला जात असून उस्मानाबाद जिल्हयात अनेक तिर्थस्थळ व व्यापारी केंद्र असल्याने गाडी बंद केल्यास त्यावर परिणाम होऊ शकता सदर गाडी बंद न करता कोल्हापूर-उस्मानाबाद-लातूर-बीदर ही गाडी पुढे हैद्राबाद पर्यंत वाढवावी जेणेकरून उत्पन्नाचा वाढीस मदत होईल, अशी मागणी केली आहे.   

ग्लोबल न्युज नेटवर्क: