मतदारांनी माझा खासदार होण्याचा हट्ट पुरवला, सुजय विखेंचा पवारांना टोला

अहमदनगर | राज्याचं लक्ष लागून असलेल्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी अखेर विजयी बाजी मारली आहे. हा विजय जवळपास एक तर्फी असाच म्हणावा लागेल, कारण अडीच लाख पेक्षा जास्त मताधिक्‍य त्यांना मिळाले आहे. त्यांच्या प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचा पराभव म्हणजे कॉंग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना एक मोठी चपराक असल्याचे मानले जात आहे.

आज विजयाची खात्री पटल्यानंतर सुजय विखे यांनी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीकास्त्र सोडले. हा विजय माझे आजोबा स्वर्गीय बाळासाहेब विखे यांना समर्पित करत असल्याचे सांगताना जिल्ह्यातल्या उत्तर आणि दक्षिण या दोन्ही भागातील कार्यकर्त्यांनी मतदारांनी आणि युतीच्या दोन्ही पक्षाने केलेल्या मदतीमुळे शक्य झाल्याचं सांगत आभार मानले.

दरम्यान, आपल्या मुलाचा हट्ट ज्यानं त्यानं पुरवावा. इतर पक्षांची ती जबाबदारी नाही. माझ्या घरातील मुलांचा हट्ट मी पुरवेन, दुसऱ्याच्या मुलाचा हट्ट मी का पुरवू, त्यांना काय वाटेल, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुजय विखेंना टोला मारला होता याला उत्तर देताना सुजय विखेंनी हे वक्तव्य केले आहे.  सुजय विखे-पाटील एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जातो. तो खासदारकीसाठी एखाद्या जागेचा हट्ट करतो. त्याचा हा बालहट्ट पुरवण्याची जबाबदारी त्यांच्या पक्षाची आहे. त्यांच्या वडिलांची आहे अस म्हणत पवारांनी  राधाकृष्ण विखेंवर हल्ला चढवला होता.

*📣जुनी जखम भरून निघाली, सुजय विखेंचा पवारांना सणसणीत टोला*

कुणी सभा घेतल्यामुळे काही फरक पडतो, लोकांना कुणाला मतदान करायचं हे चांगलं माहिती आहे, असं सांगत त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला.

जुनी जखम भरून निघाल्याचा आनंद आहे माझे आजोबा बाळासाहेब विखे पाटील यांचं विजयी होण्याचं स्वप्न होतं ते आज पूर्ण झालं. त्यामुळे हिशेब बरोबर झाला, असं म्हणत त्यांनी शरद पवारांवर टीका केली.

admin: