मंत्री सावंत यांच्या पुतण्याच्या गाडीने एकास उडवले, युवक जागीच ठार

बार्शी: जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या पुतण्याच्या गाडीने जोरदार धकड एका व्यक्तीला उडवल्याची घटना मंगळवारी सकाळी बार्शी-लातूर बायपासवर ताडसौडणे चौकात घडली. यानंतर संतप्त जमावानं सावंत यांच्या गाडीची तोडफोड केली. अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.

तानाजी सावंत यांचे नातेवाईक या गाडीतून प्रवास करत असलेल्या फॉर्च्युनर कारनं दुचाकीला धडक दिली. बार्शी-लातूर बायपास रोडवरील बीआयटी महाविद्यालयाजवळ असलेल्या शेलगाव फाटयाजवळ हा अपघात झाला. यामध्ये दुचाकीवरील शामकुमार देविदास व्हळे (वय 40 वर्ष) यांचा जागीच मृत्यू झाला.

ते शेलगावचे रहिवासी होते. यानंतर संतप्त जमावानं सावंत यांच्या गाडीची तोडफोड केली. 
याठिकाणी मोठा जमाव जमा झाला होता. गाडीवर गिरिराज असे लाव लिहिलेले आहे.

आज बीआयटी कॉलेज मध्ये इन्स्पेशन असल्याने ड्रायव्हर गाडी वेगाने चालवत होता अशी माहिती मिळत आहे.पोलिसांनी ड्रायव्हर ला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया बार्शी पोलिसात सुरू होती.

~~~~~~~~
ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi

ग्लोबल न्युज नेटवर्क: