युवा सेना प्रमुख निवडणुकीच्या आखाड्यात, वरळीत लढण्याची केली घोषणा

मुंबई । शिवसेना नेते व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार की नाही यावरून बरेच तर्क वितर्क लढवले जात होते. अखेर आदित्य ठाकरे निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. खूद्द आदित्य ठाकरे यांनीच याची घोषणा केली आहे. आदित्य ठाकरे 2 किंवा 3 ऑक्टोबरला आपला उमेदवारी अर्ज भरतील.

आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा केल्यावर मेळाव्याला उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनी टाळ्या वाजवून आणि ‘आदित्य ठाकरे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा देऊन त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले. आपल्या सगळ्यांना महाराष्ट्र पुढे न्यायचा आहे. आतापर्यंत शिवसेना पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केलेल्या प्रत्येकाचे यावेळी आदित्य ठाकरे यांनी आभार मानले.

ते म्हणाले, निवडणूक लढविण्याचा निर्णय स्वतःसाठी घेतलेला नाही. जनसंवाद यात्रेत मतदारांनी आदेश दिला होता की निवडणूक लढवली पाहिजे. त्यामुळेच मी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री होण्यासाठी मी निवडणूक लढणार नाही तर जनतेची स्वप्ने साकार करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

वरळी विधानसभा मतदार संघातून आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. आता ते या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहे. युतीची घोषणा लांबल्यामुळे आदित्य यांची उमेदवारी पक्षाने अधिकृतपणे अजून घोषित केलेली नव्हती. आदित्य ठाकरेंच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्ताने वरळीत शिवसेना मोठे शक्तिप्रदर्शन करू शकते.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi

ग्लोबल न्युज नेटवर्क: