मंत्रिमंडळात मोठे फेरबदल, शेलार नवे शालेय शिक्षणमंत्री ,विखेंकडे गृहनिर्माण तर सावंताकडे जलसंधारण खाते

मुंबई : अनेक दिवसांच्या चर्चेनंतर   राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन आज 13 नवीन सदस्यांचा समावेश करण्यात आला. त्यामध्ये 8 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्र्यांचा समावेश असून या नव्या मंत्र्यांना मंत्रिपदं देण्याबरोबरच मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या खात्यात ही मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.विनोद तावडे आणि सुभाष देशमुख यांनी खाती बदलण्यात आली आहेत.

या विस्तारात रिपब्लिकन पक्षाकडून अविनाश महातेकर यांच्यासह तेरा जणांनी मंत्री आणि राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज सकाळी अकरा वाजता नव्या मंत्र्यांना शपथ दिली. विधानसभा निवडणुकीआधी होणारा हा शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार आहे. 

यामध्ये तानाजी सावंत यांना जलसंधारण, सुरेश खाडे यांना सामाजिक न्याय मंत्रिपद देण्यात आले आहे. तर जयकुमार रावल यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन, पर्यटन, राजशिष्टाचार मंत्रिपद देण्यात आले. 

असे झाले खातेवाटप

कॅबिनेट मंत्री

■ राधाकृष्ण विखे पाटील – गृहनिर्माण

■ जयदत्त क्षीरसागर – रोजगार हमी आणि फलोत्पादन

■ आशिष शेलार – शालेय शिक्षण आणि क्रीडा व युवक कल्याण

■ संजय कुटे – कामगार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण

■ सुरेश खडे- सामाजिक न्याय

■ अनिल बोंडे – कृषी

■ अशोक उईके – आदिवासी विकास

■ तानाजी सावंत – जलसंधारण

■ राम शिंदे – पणन व वस्त्रोद्योग

■ संभाजी पाटील निलंगेकर – अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, कौशल्य विकास, माजी सैनिकांचे कल्याण

■ जयकुमार रावल – अन्न व औषध प्रशासन, पर्यटन, राजशिष्टाचार

■ सुभाष देशमुख – सहकार, मदत व पुनर्वसन

⭕राज्यमंत्री

■ योगेश सागर- नगरविकास

■ अविनाश महातेकर – सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य

■ संजय भेगडे- कामगार, पर्यावरण, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन

■ परिणय  फुके – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), वने आणि आदिवासी विकास

■ अतुल सावे – उद्योग आणि खणीकर्म, अल्पसंख्याक विकास व वक्फ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठीचे https://www.facebook.com/globalnewsmarathi/ फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर .Log On करा www.global newsmarathi.com
खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.

धिरज करळे: