विश्वचषकातील विजयाची परंपरा कायम राखत भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला धुळ चारली

खबर जगाची सकाळच्या हेडलाईन

-वृत्तसंकलन : गुरुराज माशाळ

जम्मू काश्मीरः १२ जून रोजी अनंतनाग येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेले एसएचओ अरशद खान शहीद.

जम्मू काश्मीरः पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; पूँछ सेक्टरमध्ये गोळीबार.

दिल्लीः बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घेतली माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट.

मुंबईः डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ देशव्यापी संपाची हाक; राज्यातील रुग्णालये, सोनोग्राफी सेंटर दिवसभर राहणार बंदः इंडियन मेडिकल असोसिएशनची माहिती.

मुंबई: तुमचे नेते तुमच्यासोबत राहण्यास तयार का नाहीत, विरोधकांनी आत्मपरीक्षण करावे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना टोला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलावर काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी टीका केली. राजकीय सोय आणि स्वार्थासाठी हा बदल करण्यात आल्याची टीका त्यांनी केली.

मुंबई: राजकुमार बडोले, प्रकाश मेहता, विष्णू सावरा, दिलीप कांबळे, प्रवीण पोटे, अंबरिष अत्राम यांनी दिले मंत्रिपदाचे राजीनामे.

मुंबई : राज्यमंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर; राधाकृष्ण विखे पाटील यांना गृहनिर्माण, तर आशिष शेलार यांच्याकडे शालेय शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण खात्याची जवाबदारी.

मुंबई : मंत्री मंडळ विस्तारात अकलूजचे रणजितसिंह मोहिते पाटील यांना संधी मिळेल अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र असे काहीच न घडल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

नागपूरः निवडणुका झाल्या आता वाद थांबवा; पश्चिम बंगालमधील स्थितीवर सरसंघचालक डॉ. भागवत यांच्याकडून चिंता व्यक्त.

सोलापूर : गेल्या चार महिने अधिकारी आणि पदाधिकर्यांच्या वादात अडकलेले पालिकेचे अंदाजपत्रक उद्या (27 जून रोजी) सादर होणार; महापौर शोभाताई बनशेट्टी आणि सभागृह नेते सुरेश कोळी यांचे एकमत, उद्या भाजपच्या नगरसेवकांच्या बैठक बोलविण्यात आली.

सोलापूर : सोलापूर जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख तानाजी सावंत यांनी काल मंत्री पदाची शपथ घेताच सोलापूरात सेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून पेढे वाटुन आनंद साजरा केला. सावंत यांच्या माध्यमातून जिल्ह्याला 3ऱ्या मंत्रीपद लाभले आहेत.

लंडन : विश्वचषकातील विजयाची परंपरा कायम राखत भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला धुळ चारल; भारताचा पाकिस्तानवर ८९ धावांनी दणदणीत विजय.

…………….

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठीचे https://www.facebook.com/globalnewsmarathi/ फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर .Log On करा www.global newsmarathi.com
खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.

धिरज करळे: