भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत दादा पाटील

नवी दिल्ली । भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात नियुक्ती झाल्याने त्यांच्या जागी अपेक्षेप्रमाणे केंद्रीय नेतृत्वाने भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची नियुक्ती केली आहे.

माजी प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी आज सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून नवी दिल्लीत प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा सोपवला होता. भारतीय जनता पक्षात एक व्यक्ती एक पद या धोरणामुळे आपण प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे यापूर्वीच रावसाहेब दानवेंनी सूचित केले होते.


 त्यामुळे प्रदेशाध्यक्ष कोण होणार या चर्चाना आता पूर्णविराम मिळाला आहे. मात्र प्रदेशाध्यक्ष पदावर चंद्रकांत पाटील गेल्यानंतर ते मंत्री पदावर देखील कायम राहणार आहेत.

रावसाहेब दानवे यांची बेताल वक्तव्य पक्षाला नुकसान पोचवत असल्याचे लक्षात येताच भाजपने दानवे यांच्याकडून प्रदेशाध्यक्ष पद काढून घेण्याचा निर्णय घेतला. त्यांना सन्मानपूर्वक केंद्रीय मंत्री मंडळात समाविष्ट करून दानवेंनी रीतसर प्रदेशाध्यक्ष पदापासून दूर लोटले.

त्यानंतर त्यांच्या जागी कोणाची नेमणूक करायची याचे उत्तर आज पर्यंत भाजपला सुटले नाही. त्यामुळे संघटनेत काम करण्याचा तगडा अनुभव असणारे चंद्रकांत पाटीलच या पदावर बसण्यासाठी योग्य असतील असे पक्ष श्रेष्ठींना वाटल्याने त्यांना त्या पदी नेमण्याच्या निर्णयापर्यंत भाजप येऊन पोचले आहे.

भाजपमध्ये एक व्यक्ती एक पद अशी संकल्पना आहे. मात्र चंद्रकांत पाटील या संकल्पनेला अफवाद ठरणार आहेत. कारण चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष पदावर राहून देखील मंत्री राहणार आहेत. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप संघटनेतील महत्वाच्या बाबीवर चंद्रकांत पाटील यांचा वरदहस्त राहणार आहे.चंद्रकांत पाटील हे पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे वजनदार नेते असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे ते विश्वासू म्हणून ही ओळखले जातात.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठीचे फेसबुक पेज लाईक करा.
व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा

ग्लोबल न्युज नेटवर्क: