आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांचा विशेष पुनरनिरीक्षण कार्यक्रम जाहीर

खबर जगाची सकाळच्या हेडलाईन

वृत्तसंकलन : गुरुराज माशाळ

नेदरलॅण्ड : हेरगिरीच्या आरोपात पाकिस्तानच्या तुरुंगात कैद असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव प्रकरणात नेदरलॅण्ड मधील आंतरराष्ट्रीय कोर्ट आज निर्णय देणार; भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसहा वाजता हा निर्णय येणार आहे.

वाशिंग्टन : अमेरिका एक स्वतंत्र, सुंदर आणि यशस्वी देश आहे. तुम्ही आमचा द्वेष करत असाल, इथे खुश नसाल तर इथून जाऊ शकता, असा सल्ला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या 4 महिला खासदारांना दिली आहे

नवी दिल्ली : गायक आणि संगीतकार सुरेश वाडकर, नाटककार राजीव नाईक आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांची संगीत नाटक अकादमी पुरस्कारासाठी निवड.

नवी दिल्ली : भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘रोस्टर ड्युटी’त अनुपस्थित राहणाऱ्या मंत्र्यांना दिली तंबी; मानवी संवेदनांशी जुळलेल्या मुद्द्यांवर आवाज उठवण्याचे खासदारांना आवाहन.

नवी दिल्ली – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी विश्वभुषण हरिचंदन तर छत्तीसगडच्या राज्यपालपदी अनुसया उकी यांची नियुक्ती.

नवी दिल्ली : भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील तर मुंबई अध्यक्षपदी आमदार मंगलप्रभात लोढा यांची नियुक्ती परिपत्रक जारी.

मुंबई : आमदार, खासदार, मंत्र्यांप्रमाणे थेट जनतेतून निवडून आलेले सरपंचाना पद आणि गोपनीयतेचा शपथ घेणार; राज्याचा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी नुकतीच या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, मुंबईतील जीर्ण इमारतींबाबत कायदा करण्याची मागणी.

मुंबई : विद्युत सहायकांची 5 हजार आणि उपकेंद्र सहायकांची 2 हजार पद भरली जात असून या पदांसाठी 26 जुलै पर्यंत अर्ज करता येणार आहे, कंत्राटी पद्धतीच्या या भरतीमध्ये पात्र उमेदवाराला तीनवर्षाच्या कंत्राटावर सेवा करण्याची संधी मिळेल. महावितरणने याबाबतची जाहिरात प्रसिद्ध केले आहे.

सांगोला: अमेतीकन लष्करी अळीच्या वाढत्या प्रादुर्भावास त्रासाला कंटाळलेल्या दोन शेतकऱ्यांनी 3 एकरवर रूटर फिरवून मक्याचे पीक नष्ट केली ही घटना पाचेगाव सांगोला तालुक्यात घडली आहे.

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ राजेंद्र भारूड यांची नंदुरबारचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली; भारुड यांच्या जागी अहमदनगरचे अप्पर जिल्हाधिकारी पी.टी. वायचळ यांची सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आले आहे.

सोलापूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचा दुसरा विशेष पुनरनिरीक्षण कार्यक्रम राबविण्याची घोषणा केली आहे, त्यानुसार मतदार यादीत नाव नोंदणीसाठी 20 ते 28 जुलै दरम्यान विशेष मोहीम राबविण्यात येत आहे अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल भोसले यांनी दिली.

सोलापूर : वीज ग्राहकांच्या विविध तक्रारींचे जलदगतीने निवारण व्हावे तसेच वीजग्राहकांशी थेट संवाद साधून अपेक्षा, अडचणी जाणून घेत त्यांना महावितरणच्या विविध ग्राहकसेवा अवगत करून देण्यासाठी बारामती परिमंडल अंतर्गत सर्व विभाग कार्यालयांमध्ये प्रत्येक महिन्यात वीजग्राहक दिन आयोजित करण्याचे निर्देश मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी दिले आहेत.

सोलापूर : : रात्री बारानंतर सार्वजनिक रस्त्यावर वाढदिवस साजरा करताना आढळून आल्यास, ‘बर्थ डे बॉय’ना त्यांचा केक लॉकअपमध्ये खावा लागणार; मोठी गर्दी जमवून गोंधळ करीत होणार्या वाढदिवसाच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या वतीने मोहीम सुरू.

अक्कलकोट : गुरुपौर्णिमा निमित्त काल अक्कलकोटमध्ये गर्दी पाहायला मिळाली ; लाखो भाविक अक्कलकोट निवासी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज यांची जयजयकार करत दर्शनाचा लाभ घेतला.

अक्कलकोट : अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले यांच्या स्मरणार्थ अक्कलकोट निवासी ब्रम्हांडनायक स्वामीरत्न राष्ट्रीय पुरस्कार हा माझ्यासाठी पवित्र प्रसाद आहे आणि माझे भाग्य असल्याचे गौरवोद्गार सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी व्यक्त केले

अक्कलकोट : आज सकाळी नऊ ते साडेनऊ या वेळेमध्ये श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट यांच्या वर्धापन दिनानिमित्त आणि गुरुपौर्णिमा निमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तान्त आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रावरून एकाच वेळी प्रसारित होणार आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: