भाजपच्या नेत्यांना सत्तेचा माज आला आहे-शरद पवार

सातारा:  शरद पवारांनी 50 वर्षात काय केले असा सवाल अमित शाहांनी विचारला होता. पण तुम्ही काय केलं ते सांगा, मोदी यायच्या आधी शाहाच नाव तरी माहित होत का? असा खोचक सवाल पवारांनी विचारला. तसेच पंतप्रधान येऊ शकले नाही म्हणून मी येथे आलो. बाप जन्मात तुम्हाला महाराष्ट्राच्या भूमीतून मला हटवता येणार नाही. असे प्रत्युत्तर शरद पवार यांनी अमित शहांच्या टीकेला दिले. तसेच भाजपच्या नेत्यांना सत्तेचा माज आला असल्याचे ही  पवार म्हणाले.

आज राज्यातल्या तिसऱ्या टप्प्यातल्या मतदानासाठी प्रचाराचा अखेरचा दिवस आहे. सातारा लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ येथील जिल्हा परिषद मैदानावर सभा घेतली.
विशेष म्हणजे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी बोलताना वाघाचा आवाज काढून ते आता इथे येऊन आम्हाला आव्हान देणार का? असा सवालही केला.

admin: