शिवतारे यंदा तू कसा आमदार होतो तेच बघतो-अजित पवार,बारामती मध्ये विनोद तावडे वरही टीका

बारामती: विजय शिवतारे आता पोपटासाराखा बोलायला लागलाय. शिवतारे… तू यंदा कसा आमदार होतो तेच बघतो, असा सज्जड दमच अजित पवार यांनी शिवतारेंना दिला.अजित पवारने एकदा ठरवलं की एखाद्याला नाहीच आमदार होऊन द्यायचं… तर तो नाहीच आमदार होत… असं देखील अजित पवार म्हणाले.
राष्ट्रवादीच्या उमेदवार बारामती च्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची सांगता सभा आज बारामतीत दुपारी संपन्न झाली या प्रचारसभेत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांच्यावर जोरदार टीका केली.

शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यावरच ही पवार यांनी तुझी डिग्री काय?? तु काय बोलतो काय?? तुझ्या नावातच विनोद आहे. तु शिक्षणमंत्री आहे ना… तिकडे लक्ष दे की जरा… अशा शब्दात अजित पवार यांनी विनोद तावडेंवर जोरदार हल्लाबोल केला.
भाजपा-शिवसेनेचे नेते पवार साहेबांनी काय केलं”? अस विचारतात ते विचारण्यासाठी ज्या रस्त्यानं बारामतीत आले ते रस्तेसुद्धा राष्ट्रवादी, काँग्रेस आणि बारामतीकरांनी बांधले आहेत, हे लक्षात ठेवा! पवार साहेब म्हणजेच बारामती आणि बारामती म्हणजेच पवार साहेब म्हणून सारं जग बारामतीला ओळखतंअसे ही पवार म्हणाले.

admin: