भाजपच्या काळात शेतमालाला भाव नाही. – शरद पवार

पुणे – जुन्नर: ‘कोरोनाच्या काळात नागरिकांनी एकत्र येऊ नये अशा कानपिचक्या कार्यकर्त्यांनी पवार यांना दिल्या परंतु कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव अशा कार्यक्रमाला आवर्जून यावं लागतं हे देखील त्यांनी सांगितले असे असले तरी देखील प्रत्येकाने कोरोना पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काळजी घेतली पाहिजे. असे आवाहन देखील शरद पवार यांनी शेतकरी मेळाव्यात केले

भाजप टीका करताना शरद पवार म्हणाले की, मी जेव्हा केंद्रीय कृषी खात्यात होतो तेव्हा कधीही शेतकऱ्यांनी त्यांची पिके फेकून दिली नाहीत. मात्र आता शेतकरी कंटाळून त्यांची पिके रस्त्यावर फेकून देताना दिसत आहेत. या सभेला महिलांची उपस्थिती फारच कमी होती.

यासाठी शरद पवार म्हणाले की आम्ही पन्नास टक्के आरक्षण दिले आहे. तरी देखील महिलांची उपस्थिती कमी. राजमाता जिजाऊ यांनी शिवाजी महाराजांना घडवले घडवले, त्यामुळं या आपल्या राजमातांना संधी द्या, प्रोत्साहित करा असा विचार  शरद पवार यांनी व्यक्त केला

ग्लोबल न्युज नेटवर्क: