बंगालची प्रसिद्ध अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसची नवनिर्वाचित खासदार नुसरत जहाँ निवडणूक जिंकल्यापासून चर्चेत आहे. खासदार झाल्यानंतर नुसरत जहाँ डोक्यात सिंदूर, गळ्यात मंगळसूत्र आणि चुडा भरून संसदेत आली होती. त्यावेळी तिच्या विरोधात फतवा जारी करण्यात आला होता. निखिल जैन या हिंदू व्यापाऱ्या सोबत लग्न केल्याने धर्मांध लोकांनी तिच्यावर टीका केली होती. आता याच जोडप्याला ‘आप की अदालत’ या टीव्ही शो मध्ये हजेरी लावण्याची संधी मिळाली. या ठिकाणी निखिल जैन यांना पत्नी नुसरतला प्रश्न विचारण्याची संधी मिळाली.
पतीच्या प्रश्नाला उत्तर देताना नुसरत म्हणाली की, ‘मला तुमच्याकडून या प्रश्नाची अपेक्षा नव्हती. पण मी कुटुंबाला प्राधान्य देईन. यासोबत मला दोन्ही गोष्टीत संतुलन राखायचे असून यामध्ये तुम्हाला माझी मदत करावी लागेल’, अशी गळही उत्तरादाखल नुसरतने पती निखिलला घातली.
संधी मिळाल्यावर निखिल यांनी नुसरतला प्रश्न विचारला. ‘कुटुंब किंवा आतापर्यंत तू ज्या पद्धतीने जगत आली आहे त्या आयुष्यापैकी तू कशाची निवड करशील?’, असा प्रश्न निखिल यांनी नुसरतला विचारला. भर कार्यक्रमात पतीने गोत्यात अडकवणारा प्रश्न विचारल्याने त्या अवाक झाल्या.
=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी व Filmy Marathi चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा