भगवंत महोत्सवाचा दुसऱ्या दिवशी गौरव महाराष्ट्राचा ने बार्शीकर रसिकांना केले मंत्रमुग्ध

धीरज करळे/ प्रशांत खराडे

बार्शी : बार्शी नगरपालिका, भगवंत देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त भगवंत महोत्सवाच्या माध्यमातून सुरू असलेल्या भगवंत महोत्सवाचा दुसरा दिवस राजमुद्रा मुंबई प्रस्तुत ‘गौरव महाराष्ट्राचा’ या कार्यक्रमाने गाजविला. वासुदेव गीत, गोंधळ, जोगवा, ठसकेबाज लावण्या, पोवाडा, कोळीगीत, साईदर्शन, शिवराज्याभिषेक सोहळा अशा अनेक गीते व ऐतिहासिक प्रसंगाच्या सादरीकरणातून महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचे दर्शन घडवत उपस्थित बार्शीकर रसिकांची मने जिंकली.

प्रारंभी बार्शीतील विधिज्ञांच्या हस्ते ग्रामदैवत भगवंताच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन झाले. यावेळी माजी आमदार राजेंद्र राऊत, माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, नगराध्यक्ष असिफ तांबोळी, अरुण बारबोले, विजय राऊत, मुख्याधिकारी शिवाजी गवळी, उपमुख्याधिकारी शिवाजी कांबळे, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, बार्शी वकील संघाचे अध्यक्ष अविनाश जाधव, अॅड महेश जगताप, पुरुषोत्तम गोरे, एम पी धस, सागर रोडे, दिनेशश्रीश्रीमाळ, परशुराम करंजकर, अच्युत देशपांडे, अनिल पाटील, माणिक मुंडे, श्याम झालटे, संजय जाधव, पी एन शिंदे, सचिन शेटे, व्ही व्ही इनामदार, एस बी कापसे, प्रदीप खोत, रणजित गुंड, राहुल पाटील, वंदना जगनाडे, मिसाळ, ए डी कुलकर्णी, बापू गलांडे यांच्यासह भगवंत महोत्सव समितीचे अध्यक्ष सुभाष लोढा, देवस्थान ट्रस्टचे सरपंच आदी उपस्थित होते.

अॅड अविनाश जाधव, अनिल पाटील, एम पी धस, वंदना जगनाडे यांनी आपल्या मनोगतात या महोत्सवामुळे बार्शीकरांसाठी उत्कृष्ट पर्वणी लाभली. भगवंताबरोबर बार्शीकरांशी नाळ जोडली आहे. भगवंत हा गरीबांचा बालाजी आहे. ग्रामदैवत भगवंताची व महोत्सवाची महती वाढत जावी असे सदिच्छा व्यक्त केली.

गणेशस्तवन व संत तुकारामाच्या अभंगाने या सांस्कृतिक कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी शंकर पिसाळ निर्मित या कार्यक्रमात ओंकार प्रधान हे रूप हे गणेशाचे, खेळ मांडीयेला वाळवंटी ठायी, देवा तुझ्या दारी आलो गुणगान गाया, मोरया-मोरया ,दान पावलं..गाव जागवीत आली वासुदेवाची स्वारी …जात्यावरच्या ओव्या… शेतकरी गीत, सैराट झालं जी…वर्षा दरपे हिने सादर केलेली कारभारी दमानं..ही ठसकेबाज लावणी, ज्वानीच्या आगीची मशाल हाती.., देव धनगर वाड्यात घुसला तसेच शाहीर निशांत शेख यांनी सादर केलेला पोवाडा यासह महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचे दर्शन घडविणारी विविध प्रकारची गीते सादर झाली. श्रीधर कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.

सोमवारचे कार्यक्रम

सायंकाळी सहा वाजता अपर्णाताई सहस्त्रबुद्धे यांचे भगवंत मंदिरात हरिकीर्तन तर भगवंत मैदानावावर रात्री साडेसात वाजता मोरूची मावशी हे नाटक होणार आहे.

फोटो : बंटी काळे, बार्शी

admin: