खबर जगाची सकाळच्या सुपरफास्ट हेडलाईन
वृत्तसंकलन : गुरुराज माशाळ
लंडन : लंडनचे माजी महापौर बोरिस जॉन्सन ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. बोरिस जॉन्सन हे ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांची जागा घेतील. ब्रक्झिटनंतर थेरेसा मे यांनी 7 जून रोजी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता.
इस्लामाबाद : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा सोडवण्यासाठी भारत आणि पाकिस्तानदरम्या चर्चा व्हावी यासाठी मध्यस्थी करण्याच्या प्रस्तावावर भारताने दिलेली प्रतिक्रिया आश्चर्यकारक असल्याचं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटलं आहे.
नवी दिल्ली : काश्मीर मुद्द्यावर तोडगा हा द्विपक्षीयच असू शकतो. त्यात तिसऱ्याने येण्याची गरज नाही – परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने 1984 मध्ये दिल्लीत झालेल्या शीख विरोधी दंगलीतील 34 जणांना जामीन मंजुर केला आहे. यापूर्वी 5 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातील सात जणांना जामीन मंजूर केला होता.
बंगळुरू : मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेले कर्नाटकातील राजकीय नाट्य अखेर संपले, विश्वासदर्शक ठरावावर अखेर काल मतदान पार पडलं. यावेळी विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने ९९ मते पडली, तर ठरावाच्या विरोधात १०५ मतं पडली.
मुंबई : कर्नाटकमधील राजकीय घडामोडीवर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया दिली, तूर्तास ‘लोटस’ जिंकलं असेल, पण लोकशाही हरली हे दुर्दैव आहे अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिले.
मुंबई : काँग्रेस पक्षाने सुरूवाती पासून अनेक पदावर काम करण्याची मला संधी दिली. त्या प्रत्येक पदाला न्याय देण्याचे मी काम केले आहे, मला काँग्रेस पार्टीने सर्व काही दिले आहे, जर दुसर्या पार्टीत गेलो असतो, तर काही मिळालं नसतं, अस माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे.
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रतिज्ञा पत्राच्या कागदपत्रात त्यांच्या विरोधातील गुन्ह्यांची माहिती लपवली होती असा आरोप करत, त्यांची विधानसभेवरील निवड रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे.
मुंबई : येत्या 24 ते 48 तासांमध्ये मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कुलाबा वेधशाळेचे शास्त्रज्ञ विश्वंभर यांनी मंगळवारी याबाबत माहिती दिली.
सोलापूर : मंगळवेढा येथील जगज्योति महात्मा बसवेश्वर स्मारकाच्या आराखड्यास 15 दिवसात मंजुरी दिली जाईल अशी आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत दिले. दोन वर्षांपासून रखडलेल्या स्मारकाच्या प्रश्न मार्गी लागणार असल्याने लिंगायत बांधवांतून समाधान व्यक्त होत आहे.
सोलापूर : लोकमान्य टिळकांच्या जयंती निमित्त महापौर शोभा बनशेट्टी यांनी काल सोलापूर महानगर पालिकेच्या वतीने टिळक चौकातील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केला.
सोलापूर : आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत. शुक्रवार २६ जुलै रोजी राष्ट्रवादीचे जिल्हा प्रभारी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली रामलाल चौकातील राष्ट्रवादी भवनात इच्छुकांची मुलाखती होणार आहेत.
सोलापूर : मोटारसायकल वरून अवैध रित्या हातभट्टी दारू वाहतूक करणाऱ्यावर कारवाई केली म्हणून चौघे जणांनी मिळून पोलीस कर्मचाऱ्यांला बेदम मारहाण केल्याची घटना उत्तर सोलापूर तालुक्यात घडली आहे, या प्रकरणी चार जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करमाळा : दिग्विजय बागल आणि सदाशिव पाटील या दोघांचे करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पद राज्याचे पणन संचालक डॉ. किशोर तोष्णीवाल यांनी अपात्र ठरवत संचालक पद रद्द करण्याचा निर्णय दिला, दिग्विजय बागल यांच्या संचालक पदावर गंडांतर आल्याने बागल गटाला धक्का बसला आहे.
अक्कलकोट : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे विद्यमान आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी आपल्या समर्थक व कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे, ही बैठक आज दुपारी 1 वाजता वागदरी रोडवरील टीनवाला फंक्शन हॉल येथे होणार आहे. या बैठकीत पुढील रणनीती ठरविले जाणार असून तालुक्यातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे अशी आवाहन आमदार म्हेत्रे यांनी केले आहे.
अक्कलकोट : अक्कलकोट तालुका भाजपचे तालुकाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांचे वडील कै. पंचप्पा कल्याणशेट्टी सर यांच्या 4थ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विवेकानंद परिवार तर्फे अक्कलकोट येथील टिनवाला फंक्शन हॉल येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या रक्तदान शिबिरास अक्कलकोट शहर आणि तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी भर भरून प्रतिसाद दिला. या रक्तदान शिबिरात 353 रक्तदात्यांनी रक्तदान केले.