‘बिनकामाची पन्नाशी’ ! महाभकास आघाडी सरकार, भाजपची सरकावर विखारी टीका

मुंबई | शिवसेना भाजप युतीचा काडीमोड झाला. नंतर शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सत्तेत येत नवा संसार थाटला आहे. महाविकास आघाडीने राज्यात सत्ता स्थापन केली आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी थाटामाटात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता हे नवे सरकार स्थापन होऊन 50 दिवस झाले आहेत. मात्र तरी राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेविरुद्ध माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस असा राजकीय संघर्ष थांबलेला नाही. आता भाजपने महाविकास आघाडीच्या सरकारव विखारी टीका केली आहे.

आज महाविकास आघाडीच्या सरकारला 50 दिवस पूर्ण झाली आहे. याचे असल्याचे औचित्य साधत सोशल मीडियावर भाजपाने ‘बिनकामाची पन्नाशी’ अशा शब्दांत घणाघाती टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळातील 50 दिवस आणि त्यावेळी फडवणीस यांच्या सरकारमधील महत्त्वाचे निर्णय याची तुलना करतात. फडवणीस सरकारविरुद्ध ‘महाभकास आघाडी सरकार’ असे भाजप महाराष्ट्रकडून tweet करण्यात आले आहे.

फडवणीस सरकार यांनी या कवितेच्या माध्यमातून कोण कोणती सार्वजनिक कामे केली होती. कर्जमाफी जलयुक्त शिवार, शेतकरी धोरण छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकाला मंजुरी, नवी मुंबईतील विमानतळ आरक्षणाचे प्रलंबित प्रश्न, यासह अनेक निर्णयांची यादीच केली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: