बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची आमदार राजेंद्र  राऊत यांची मागणी


 बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची आमदार राजेंद्र  राऊत यांची मागणी

    बार्शी: मागील काही दिवसांपासून बार्शी तालुक्यात सतत पडत असलेल्या जास्त प्रमाणाच्या  परतीच्या पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन,तूर,कांदा आदी खरीप  पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. मुळात सुरुवातीला पाऊस नसल्याने खरीप आली नाहीत कशी बशी तग धरून आली तर परतीचा पाऊस जास्त झाला व पुन्हा शेतकरी अडचणीत आला, त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. या नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करावेत अशी मागणी नूतन आमदार राजेंद्र  राऊत यांनी तहसीलदार  प्रदीप शेलार व जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले  यांच्याकडे पत्राद्वारे केलेली आहे. नुकसान झालेले पिकांचे पंचनामे झाल्यानंतर त्या नुकसानीची भरपाई शेतकरी बांधवांना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार राजेंद्र राऊत यांनी  सांगितले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: