लॉकडाऊनच्या काळात प्रशासनाने मोकळीक दिल्यानंतर बार्शीत नागरीकांकडुन होत असलेली गर्दी कमी करण्यासाठी बार्शी नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनीनगरपलिकेसह तालुका प्रशासनाला एका निवेदनाद्वारे काही उपाय सुचवले आहेत.
या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हाधिकारी सोलापूर यांचे दिनांक 7 मे 2020 चे आदेशान्वये स्थानिक प्रशासनास नियमावली बनवण्याच्या सुचना दिल्याप्रमाणे बार्शी शहरात लॉक डाउन शिथिलते बाबत जे निर्णय घेण्यात आले त्याची अंमलबजावणी सुरू झालेली पाहिली .
वास्तविक पाहता जे चित्र पहावयास मिळाले ते अत्यंत विदारक, भयावह आणि चिंता वाढवणारे आहे. महोदय विरोधी पक्ष नेता या नात्याने आपणाकडे सविनय विनंती करतो की ,खालील सूचनांचा लॉक डाऊन काळातील शिथिलते मध्ये समावेश करून काटेकोर अंमलबजावणी झाल्यास बार्शी आणि परिसर कोरोणा मुक्त राहण्यास प्रशासकीय यंत्रणा व नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नातून मदत होईल ,तरी विनंती .
1) बार्शी शहरातील भौगोलिक परिस्थिती पाहता सुभाषनगर, कसबा पेठ बाजारपेठ ,भवानी पेठ इ.असे भौगोलिक भाग निहाय विविध रंगांचे कार्ड कर वसुली विभागाकडे असलेल्या मालमत्तांच्या नोंदीप्रमाणे कुटुंब प्रमुख यांच्या नावे देण्यात यावेत .सदर कार्ड धारक नागरीकासच बाजारात खरेदीसाठी फिरण्याची मुभा असेल .
2) सदर कार्डवर आठवड्यातील वार नेमून देण्यात यावेत त्याच दिवशी ते नागरिक बाजारात खरेदीसाठी जाऊ शकतील.
3 )दुकानदाराने कार्ड असल्याशिवाय कोणत्याही वस्तूची विक्री करू नये.
4) दुकाने आस्थापना ची वेळ सकाळी अकरा ते सायंकाळी पाच ही ठेवण्यात यावी यामुळे हौशे नवशे विनाकारण बाजारात फिरण्याची प्रमाण कमी होईल .
5 )खरेदीसाठी दुचाकी वाहनावर फक्त एक तर चारचाकी वाहनातून फक्त दोन जण स प्रवासाची मुभा देण्यात यावी .
6)नगरपरिषदेने यापूर्वी ठरविल्याप्रमाणे दिशा निहाय ,दिवस निहाय दुकाने चालू ठेवणे त यावी यामध्ये मा .जिल्हाधिकारी यांच्या आदेशातील कापड बाजाराचाही समावेश असावा .
बाकी अटी शर्थी लागु असतीलच .आपण विनंती चा विचार कराल ही अपेक्षा.
सदर विनंती प्रमाणे कार्यवाही केल्यास गर्दी वरील नियंत्रण राखणे प्रशासनास सोयीचे होईल आणि आणि नागरिकांमध्येही ही शिस्तीचे पालन करण्याचा प्रयत्न होईल असे म्हटलं आहे.
या निवेदनाच्या प्रति
जिल्हाधिकारी सोलापूर,पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण ,
प्रांत अधिकारी सोलापूर , पोलीस उपाधीक्षक बार्शी उपविभाग बार्शी , तहसीलदार बार्शी , पोलीस निरीक्षक बार्शी , मुख्याधिकारी बार्शी नगरपरिषद बार्शी यांना दिल्या आहेत.