त्या संशयित रुग्णाला मिळाला डिस्चार्ज
बार्शीत त्या ऑडिओ क्लिपमुळे अफवेचा बाजार
अफवांवर विश्वास ठेवु नका प्रशासनाचे आवाहन
प्रतिनिधी बार्शी
कोरोना संशयित रुग्णामध्ये रोगाची लक्षणे आढळून न आल्याने सदर व्यक्तीस ग्रामीण रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
शहरात एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर कथित कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेला रुग्णाचा शोध प्रशासनाने घेतला. संशयित रुग्णास ग्रामीण रुग्णालयात स्वतंत्र कक्षात वैद्यकीय निगराणीखाली ठेवण्यात आले होते. सदरच्या संशयितामध्ये आजाराची लक्षणे दिसून आली नाहीत. त्यामुळे सदरच्या संशयितास डिस्चार्ज देऊन प्रतिबंधात्मक काळजी घेण्याच्या सूचना संबंधितांस देण्यात आल्या.
तसेच ग्रामीण भागातून सोलापूर मध्ये दाखल केलेल्या संशयितामध्येही कोरोनाची लक्षणे आढळून न आल्याने त्या संशयितास ही डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, बार्शीत कोरोनाचा संशयित आढळल्याने शहर व तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे.
चौकट :
काय आहे ती क्लीप ः
त्या वादग्रस्त क्लीप मध्ये एक व्यक्ती बार्शी शहरातून तर दुसरी व्यक्ती पुणे शहरातून बोलत असून ती व्यक्ती सातत्याने खोकत असल्याचे ऐकायला येत आहे. या दोघांच्या संवादात बार्शीतील एका व्यक्तीचा उल्लेख झाल्याने बार्शीतील सामाजिक कार्यकर्ते व बार्शी नगपरिषदेचे वैद्यकिय अधिकारी यांनी सदर व्यक्तीचा युध्दपातळीवर शोध घेत त्याला तातडीने मंगळवारी (ता.17) रात्री उशीराने बार्शी ग्रामीण रूग्णालयात दाखल केले होते मात्र कोरोना संशयित रुग्णामध्ये रोगाची लक्षणे आढळून न आल्याने सदर व्यक्तीस ग्रामीण रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
सरदच्या वादग्रस्त क्लीप मधील दोन व्यक्ती व त्या क्लीप मध्ये उल्लेख असलेली बार्शीतील व्यक्ती असे तिघेजण पुण्यातील एकाच खोलीत राहत असून त्यातील दोघेजण रविवारी (ता.15) रोजी बार्शी शहरात आली असल्याची चर्चा आहे. त्यातील एक बार्शी तालुक्याच्या ग्रामीण भागातील तर एक शहरातील आहे.
या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप मुळे शहरातील नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू झाल्या असून लोकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाची ती वादग्रस्त क्लीप प्रसारित करून शहरात कोरोनाची अफवा पसरविणार्या त्या तरूणा विरूध्द काय ठोस कायदेशीर कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.