माढ्यातील निमगाव सह काही गावात फेर मतदान घ्यावे भाजप उमेदवाराची मागणी

माढा : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात सकाळी 11 च्या सुमारास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांच्या निमगावसह अन्य काही गावांमधील भाजपच्या पोलिंग एजंटांना मतदान केंद्रांवरुन हाकलल्याचा आरोप करत येथील मतदान प्रक्रिया रद्द करावी, फेर मतदान घ्यावे आणि संबंधित केंद्रांवरील अधिकाऱ्यांना निलंबीत करावे, अशी मागणी भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांनी केली आहे.

मोहिते-पाटील यांच्या अस्तित्वाचा तर शरद पवार यांच्या प्रतिष्ठेच्या या मतदारसंघात विजय मिळविण्यासाठी दोन्ही उमदेवारांनी कंबर कसली आहे. मतदारांची उत्सुकता अन्‌ संजय शिंदे यांचा मतदारसंघातील बोलबाला, या पार्श्‍वभूमीवर रणजितसिंह निंबाळकर यांनी करमाळा, सांगोला, पंढरपूर या ठिकाणी जाऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी माढ्यातच ठाण मांडल्याचेही पहायला मिळाले. त्यांचे प्रतिनिधी धैर्यशील मोहिते पाटील हे आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले.

admin: