बहुजन वंचित आघाडी ठरणार निर्णायक, गावोगावी मोठ्या प्रमाणात दलित व अल्पसंख्याक समाज एकवटल्याची चर्चा

गणेश भोळे

बार्शी : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात सायंकाळी सहा वाजेपर्यंत सरासरी ६२ टकके मतदान झाले़ या निवडणुकीमध्ये प्रथमच सक्षम तिसरा पर्याय म्हणून समोर आलेल्या बहुजन वंचित आघाडीची कपबशी सर्वच मतदान केंद्रावर चालली असल्याची चर्चा असून वंचित ने
घेतलेल्या या मतदानाचा नेमका कोणाला फटका याकडे सर्वांच्या नजरा लागल्या असल्या तरी आघाडी व महायुती च्या उमेदवारांनी मात्र याचा
चांगलाच धसका घेतल्याचे दिसत आहे़ उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात महाआघाडीचे आ़
राणाजगजितसिंह पाटील, महायुतीचे ओमराजे निंबाळकर व
बहुजन वंचित आघाडीचे प्रा़ अर्जून सलगर अशी लढत झाली़
सुरुवातीला लढत तिरंगी दिसत असली तरी दुरंगीच होईल असे
बोलले जात होते़ वंचित आघाडीने सुरुवातीच्या टप्यात बार्शीत कार्यकर्ता मेळावा घेतला होता़ तर प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सुजात आंबेडकर यांनी सभा घेतली होती़ उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात दलित, धनगर, मुस्लिम आदी समाजाच्या मतदारांची संख्या ही जास्त आहे़ बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाने ही आघाडी स्थापन केली असून ते शेजारच्या सोलापूरातून उभे आहेत त्यामुळे
यंदा बाबासाहेबांसाठी वंचित आघाडीलाच मतदान करायचे असा सुर अल्पसंख्याक मतदारातून उमटत होता़ व तशा पध्दतीने मतदान झाल्याची
चर्चा महाआघाडी व महायुतीचे कार्यकर्ते करत होेते़ अर्जून
सलगर हे धनगर समाजाचे असून मतदारसंघात हा समाज ही मोठ्या प्रमाणावर आहे़ त्यामुळे वंचित आघाडीच्या उमेदवार यातील किती मते घेऊन कोणाला मारक व कोणाला तारक ठरणार हे निकालादिवशीच समजेल़

admin: