फेसबुकवर वादग्रस्त पोस्टने धगधगतय बार्शीचं राजकारण,वाचा सविस्तर-

फेसबुकवर वादग्रस्त पोस्टने धगधगतय बार्शीचं राजकारण

 ९ दिवस उलटले तरी सायबर सेलला बोगस अकाऊंटचा तपास लागेना , पुन्हा फेसबुक वॉर सरू

बार्शी -गणेश भोळे

बार्शी : बार्शी शहरात  गेल्या आठ दिवसापासून  फेसबुकवर बोगस नावाने राजकीय नेत्याबद्दल  टाकल्या जात असलेल्या वादग्रस्त व बदनामीकारक पोस्टवरुन राजकीय वातावरण अशांत झाले असून यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ याप्रकारणी पोलीसात फिर्याद देऊन देखील पोलीसांनी हे प्रकरण गांभिर्याने न हाताळल्यामुळे बार्शीत फेसबुक वॉर सुरू झाल्याने कोणत्याही क्षणी राजकीय भडका उडण्याची शक्यता निर्माण होत आहे

बार्शी तालुक्यातील राजकारण हे गेल्या वीस वर्षापासून संवेदनशिल असून याठिकाणी भाजप नेते राजेंद्र राऊत व राष्ट्रवादीचे आ दिलीप सोपल यांच्यात प्रत्येक निवडणुकीत टोकाचा राजकीय संघर्ष होत आहे़ या राजकीय स्पर्धेतून कित्येक वेळा मोठी भांडणे होऊन परस्परविरोधी गुन्हे ही दाखल झाले आहे़ बार्शीच्या या कट्टर राजकारणाची पोलीसांना देखील जाण आहे़ यापुर्वी झालेल्या विविध निवडणुकांच्या राजकीय सभांमधून देखील या नेत्यांनी परस्परांवर टोकाची टिका देखील केली जात आहे.

मात्र मागील आठवड्यात विधानसभेची निवडणुक आणखी चार महिने लांब असताना व कोणताही राजकीय इंव्हेंट नसताना कांही विष्नसंतोषी  
शांतता भंग करणारी मंडळी राजकीय वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत असताना दिसू लागली आहेत.

याबाबत अधिक माहिती की, मागील आठवड्यात राऊतांची पोलखोल या नावाने फेसबुकवर फेक अकाऊंट काढून भाजपा नेते माजी आ़ राजेंद्र राऊत व  बाजार समितीचे चेअरमन रणविर राऊत व त्यांच्या कार्यकर्त्यांची जिव्हारी लागणाऱ्या वादग्रस्त टिकाटिपण्णी असणाऱ्या पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत़ तसेच या अकाऊंटवरुन राऊत यांच्या व्यवसायाची देखील बदनामी केली जात आहे.
विशेष म्हणजे या अकाऊंटच्या डिपीला राऊत यांचा फोटो वापरला गेलेला आहे.

याबाबत बाजार समितीचे चेअरमन रणवीर राऊत यांनी दि़ २३ जून रोजी बार्शी शहर पोलीसात रितसर फिर्याद दिली आहे़ मात्र या प्रकरणी आठ दिवस होऊन गेले तरी पोलीसांनी या प्रकरणाचा  गांभिर्याने तपास न करता हे अकाऊंट शोधून काढले नाही़ पुर्वी एका नेत्यांची बदनामी करण्याच्या पोस्ट येत होत्या मात्र आता त्याला विरोधी गटाने देखील प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.

 दरम्यान रोजच नव नवीन कांहीतरी बदनामीकारक पोस्ट टाकत असल्याने राऊत गटांच्या कार्यकर्त्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलीस कांही निर्णय घेत नाहीत त्यामुळे आपण ही याला सडेतोड उत्तर देऊयात म्हणत सोमवारी दिवसभर राऊत गटांच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या राजकीय विरोधकांच्या विरोधात प्रत्यक्ष  अप्रत्यक्षपणे बदनामी करणाऱ्या पोस्ट व्हायरल करण्यास सुरुवात केली आहे़ 

हिन खालच्या पातळी व कमरेखालील  शाब्दीक वार करणाऱ्या पोस्ट व्हायल  झाल्याने वातावरण अधिकच चिघळत आहे़  बार्शीतील या  फेसबुक वॉर मुळे शहरात कोणत्याही वेळी विपरीत कांहीतरी घडण्याची भीती जाणकार व्यक्त करीत आहेत.

बार्शी पोलीसांनी या  पोलखोल अकाऊंटची वेळीच खबरदारी घेत तपास करुन त्यावर बंदी घातली असती तर राऊत गटांच्या कार्यकर्त्यांनी अशा प्रकारच्या पोस्ट टाकण्याची पाळीच आली नसती़ या फेसबुक वॉरमुळे शहर व तालुक्यातील राजकीय भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली असून यातून काही बरेवाईट होऊन शहराच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु शकतो त्याची सर्वस्वी जबाबदारी  पोलीस प्रशासनाची असणार आहे़

राऊत यांनी याप्रकरणी वारंवार बार्शीचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्यासह जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्याशी संपर्क साधून या प्रकरणाचा गांभिर्याने तपास करुन फेक अकाऊंटचा शोध  घ्यावा अशी विनंती देखील केलेली आहे तरी देखील पोलीस प्रशासन व सायबर सेलचे अधिकारी बघ्याची भूमिका पार पाडत आहेत का असा सवाल सुज्ञ नागरिकातुन उपस्थीत होत आहे .

आम्ही सायबर सेलला कळविले आहे

या फेक अकाऊंटच्या अनुषंगाने आलेल्या तक्रारीनूसार आम्ही सायबर सेलला कळविले आहे़ त्यांचा तपास सुरु असून त्यांच्याकडून माहिती येताच संबधितांवर कारवाई केली जाईल़ 
सर्जेराव पाटील पोलीस निरीक्षक बार्शी शहर पोलीस स्टेशन

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठीचे फेसबुक पेज लाईक करा.
व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा

ग्लोबल न्युज नेटवर्क: