फडणवीसांच्या या शुभेच्छांना उत्तर देताना संजय राऊतांनी काढले फडणवीस यांना चिमटे

मुंबई । महाराष्ट्रात विरोधीपक्षच राहणार नाही, असा दावा करणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्ष नेतेपदी निवडून आल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा’ असं ट्वीट करत शीवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना खोचक टोला लगावला आहे. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीला भाजपतर्फे देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित राहिले होते.

शपथविधी सोहळ्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट न घेताच काढता पाय घेतला. त्यानंतर फडणवीस यांनी ट्विटरवरून उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या. “शिवसेनेचे कार्याध्यक्ष श्री उद्धव ठाकरेजी यांनी मुख्यमंत्रीपदाची आज शपथ घेतली. त्याप्रसंगी उपस्थित होतो. त्यांचे अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा!” असं देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा देताना म्हटले आहे.

तर फडणवीसांच्या या शुभेच्छांना उत्तर देताना संजय राऊत यांनी फडणवीस यांना चिमटे काढले आहेत. “महाराष्ट्र में विरोधी पक्ष ही नहीं रहेगा, यह दावा करने वाले पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को विरोधी दल नेता चुने जाने पर हार्दिक बधाई…!” असं ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: