प्रेम म्हणजे काय असते ? दोन मिनिटे वेळ काढून हे वाचाच !

प्रेम म्हणजे काय असते ? दोन मिनिटे वेळ काढून हे वाचाच !
.
एकदा एक पत्नी विचार करते, की नवऱ्याच्या जीवनात आपले किती स्थान आहे ?

हे समजले पाहिजे म्हणून ती एकेदिवशी नवरा ऑफिसमधून घरी यायच्या वेळेस टेबलावर चिट्ठी लिहून ठेवते की, “मी कंटाळली आहे या संसाराला.
त्यामुळे कायमचे हे घर सोडून जातेय”

आणि स्वतः कपाटामागे लपून उभी राहते. हे पाहण्यासाठी की, नवऱ्याची प्रतिक्रिया कशी येते ?
त्यावर तिला तिचे स्थान कळणार असते.
नवरा येतो. समोरच टेबलवर ठेवलेल्या चिट्ठीवर लक्ष जाते. तो ती चिट्ठी वाचतो.

घरात इकडे तिकडे पाहतो.
नंतर त्या चिट्ठीवर खालच्या बाजूला दोन तीन ओळी लिहितो आणि मस्त गाणे म्हणत, शिट्टी वाजवत तो एक फोन करतो..!

नवरा (फोन वर) : “हाये, आज मी मुक्त झालो. बायको सोडून गेलीय. आता आपण केव्हाव्ही भेटू शकतो.
तू लगेच ये.”

असे म्हणून नवरा बाहेर पडतो. कपाटामागून पत्नी बाहेर येते. डोळ्यात पाणी जमा झालेले, दुःख अनावर झालेले.एवढ्यात तिचे लक्ष टेबलवरच्या त्या चिट्ठीकडे जाते. त्यावर नवऱ्याने मघाशी काहीतरी लिहिलेले असते.

ते ती वाचते. “कपाटामागून तुझे पाय दिसत होते बावळट !! खाली दुकानातून ब्रेड आणि तुला आवडणारी खारी नानकटाई आणायला जातोय.

दहा मिनिटात येईन तोवर चहा करून ठेव !! आणि अजून एक गंमत, तीन दिवस झाले आपला फोन डेड आहे. तुझ्या लक्षात नव्हते का ?

असो और एक बात याद रखना :
मेरी जिंदगीमे खुशिया, तेरे बहाने से हैं
आधी तुझे सताने से हैं
आधी तुझे मनाने मे है !!

ती चिट्ठी हातात गच्च धरून कितीतरी वेळ ती पत्नी त्या चिट्टीची पप्पी घेत राहते, तर दुसरीकडे डोळ्यातून आनंदाश्रू ओघळत असतात…!

क्लास : एकदा एखाद्याला “आपले” मानले तर त्याची कधीच परीक्षा घेऊ नये. तुम्ही आम्ही कोण परीक्षा घेणारे ??

तो जो “काळ” नावाचा महागुरू बसलाय न तो सर्वांची परीक्षा घेतो..! म्हणून जोडीदाराच्या कोणत्याच गोष्टीवर कधीच संशय घेऊ नका..!

काही खटकले असेल तर थेट समोरासमोर बसून बोला. निरसन करून घ्या. पण संशयाला मनात अजिबात जागा देऊ नका.

ग्लोबल न्युज नेटवर्क: