अबब…! जगातील सर्वाधिक पावसाचे आता ठिकाण महाराष्ट्रात.. .!

महाबळेश्वर मधील व्यापारावर विपरीत परिणाम झाला असून स्थानिकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे

सातारा | जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस पडतो आहे. यावर्षी च्या पावसाळ्यात आतापर्यंत  7777 मी.मी पाऊसाची नोंद झाली आहे. संपूर्ण भारतात पावसा चे प्रमाण वाढले असून महाराष्ट्राची चेरापुंजी महाबळेश्वरला गेल्या चोवीस तासांत पडलेला पाऊस मिळून यावर्षी 7777 मी. मी पाऊसाची नोंद झाली असून 12 वर्षांपूर्वीचा पाऊसाचा विक्रम मोडीत निघाला आहे.

महाबळेश्वर मध्ये सध्या पाऊसाची संततधार चालू असून जनजीवन विस्कळित झाले आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे महाबळेश्वर मधील व्यापारावर विपरीत परिणाम झाला असून स्थानिकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.

जगात सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणुन मॉसिनराम, चेरापुंजीला मागे टाकत महाबळेश्वर पहिल्या क्रमांकावर आले आहे. हवामान खात्याने नुकतीच या बाबतची आकडेवारी प्रसिध्द केली आहे. या आकडेवारीनुसार यंदा मॉसिनराम शहरात आजपर्यंत साडेसहा हजार मिमी पावसाचा टप्पा पार केला आहे. तर महाबळेश्वर शहरात साडेसात हजार मिमी पाऊस झाला आहे. तब्बल तेरा वर्षांनतर १ जुन ते ८ सप्टेंबर अखेर येथे ३०० इंच पावसाची विक्रमी नोंद झाली आहे. मागील वर्षी याच काळात येथे २३७ इंच पावसाची नोंद येथे झाली होती.

कोकण , पश्चिम घाटात आणि मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर हे असे आगळं वेगळं गिरीस्थान आहे कि या ठिकाणी नेहमी सरासरी पेक्षा अधिक पावसाची नोंद होते. महाबळेश्वर येथे सदाहरीत घनदाट जंगल उंच डोंगररांगा अशी भौगोलिक स्थिती असुन, येथे पावसाळयात थंडी आणि दाट धुक्याची चादर पसरलेली असते. अशा वातावरणात येथे वर्षा सहलीसाठी मोठया संख्येने पर्यटक येतात आणि पावसाचा आनंद लुटतात. यंदा देशातच नव्हे तर जगात सर्वाधिक पाउस पडणारे ठिकाण म्हणुन महाबळेश्वर शहराची नोंद झाली आहे.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी  चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.

ग्लोबल न्युज नेटवर्क: