प्रसिद्धीपत्रकाद्वारे महायुतीची घोषणा, जागावाटपाचा फॉर्म्युला मात्र गुलदस्त्यात

मुंबई । संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या शिवसेना भाजपा युतीची घोषणा अखेर करण्यात आली आहे. संयुक्त पत्राद्वारे महायुतीची घोषणा करण्यात आली आहे. महायुतीची घोषणा जरी करण्यात आलेली असली तरी जागावाटप मात्र जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे कोणता पक्ष किती जागा लढवणार हे गुलदस्त्यात आहे.

महायुतीतील सर्व मित्रपक्षांच्या प्रमुखांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रसिद्धि पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. या पत्रकावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

युतीची घोषणा झाली असली तरी जागावाटपासंदर्भातील संभ्रम अद्यापही कायम आहे. भाजप-सेना किती जागेवर लढणार आणि मित्रपक्षांना किती जागा सोडणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर असल्यामुळे फॉर्म्युला गुलदस्त्यात ठेवण्यात आला असून संयुक्त पत्रकार परिषदेशिवाय पत्रकाच्या माध्यमातून महायुतीची घोषणा करण्यात आल्याचे दिसत आहे.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi

ग्लोबल न्युज नेटवर्क: