प्रभावशाली लोकांना भेटण्यासाठी धीरुभाई अंबानी प्यायचे हॉटेल ताज मध्ये कॉफी

प्रेरणादायी व्यक्तिमत्व सुरवातीच्या काळात धीरूभाई अंबानी मुंबई मध्ये दररोज संध्याकाळी फिरायला जात असत. अनेकदा ते ताज हॉटेल मध्ये एक कप कॉफी प्यायला जात असत. त्या काळात ताज हॉटेल मध्ये एका कॉफीची किंमत हि ६५ रुपये होती. इतकी महाग कॉफी फक्त श्रीमंत आणि प्रसिद्ध लोकांनाच परवडू शकत होती.

त्या काळात धीरूभाई ज्या परिस्थिती मध्ये होते ती लोकं, व्यवसायिक मित्र हे रस्त्याच्या कडेला असलेल्या टपरीवर ५ रुपयांची कॉफी पिणे पसंद करत असत आणि धीरूभाई अंबानी हे ताज हॉटेलच्या बाल्कनीत बसून त्या महागड्या कॉफीचा आनंद लुटत असत.

एकदा धीरूभाई अंबानी च्या मित्राने त्यांना विचारले “जर तुला फुटपाथवर असलेल्या टपरीवर ५ रुपये देवून खिश्याला ताण न पडता कॉफी पिऊ शकतो तर मग तू ताज हॉटेलमधील महागड्या कॉफी मागे ६५ रुपये का घालवतो?”
धीरूभाईनि उत्तर दिले “मी त्या कॉफी साठी ५ रुपयेच देतो, बाकीचे ६० रुपये हे शहरातील प्रभावशाली लोकांना भेटायची संधी ताज हॉटेल देते त्या साठी देतो.”

हे काही फक्त एक कप कॉफी साठी नाही आहे. माझ्या आत्मविकासासाठी आणि जी लोक जगावर प्रभाव पाडतात अश्यांसोबत संबंध बनवण्यासाठी आहे.

जेव्हा त्यांचे साथीदार सारखी परिस्थिती असलेली लोक हि तडजोड करून पैसे वाचवायला प्राधान्य द्यायची तेव्हा धीरूभाई हे आत्मविकास करण्यासाठी, प्रगती करण्यासाठी, श्रीमंत होण्यासाठी जे काही करावे लाग होते त्यासाठी पैसे खर्च करायचे.

धीरूभाई अंबानी प्रत्येक क्षणाला असा विचार करत असत

admin: