मुंबई : पश्चिम महाराष्ट्रातील महापूर ग्रस्त लोकांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन मदतीचा ओघ सुरू असून यासाठी विविध देवस्थान ट्रस्ट, समाजसेवी संस्था, राजकीय पक्ष, सिनेकलाकार मदत करण्यासाठी पुढे येत आहेत.यात कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकण या भागात पूराने त्या भागातील लोकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळित केले आहे. तेथिल पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी कलाकार मंडळी पुढे सरसावली आहे. मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांनी 25 लाख रुपयांची मदत केली आहे.
सोमवारी रितेश आणि जेनेलिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. त्यांनी 25 लाख रुपयांची चेक मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिला आहे, अशी माहिती देणारं मुख्यमंत्र्यांनी ट्वीट केलं आहे.
रितेश आणि जेनेलिया यांनी पूरग्रस्तांना केलेल्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांनी त्या दोघांचेही आभार मानले आहेत.
पश्चिम महाराष्ट्रात पूरामुळे लाखो कुटुंबांचा संसार उघड्यावर पडला आहे. सरकार, सामाजिक संस्थांकडूनही मदतीचा ओघ कायम सुरु आहे. त्यातच कलाकारांनीही मदतीचा हात पुढे केला आहे.