पुण्यात भिंत कोसळून १७ मजुरांचा मृत्यू

पुणे : पुण्यात कोंढवा भागात सोसायटीची भिंत कोसळून १७ बांधकाम मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना रात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. ढिगाऱ्याखालून तिघांना जिवंत काढण्यात यश आलं आहे. अद्याप बचावकार्य सुरू आहे. एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

ढिगाऱ्याखाली आणखी काहीजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येतेय.

मृतांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे. घटनेत जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींमध्येही मुलांचा समावेश आहे. मृत झालेले सर्व मजूर हे पश्चिम बंगाल आणि बिहारचे होते, अशी माहिती समोर आलीय.

या ठिकाणी मोठ्या बांधकामासाठी पोकलेन मशीनच्या साहाय्याने खोदकाम सुरु आहे. त्याला लागूनच बांधकामावर काम करणाऱ्या मजुरांच्या झोपड्या होत्या. परंतु रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे आणि शेजारी सुरु असलेल्या खोदकामामुळे आल्कन स्टायलस या सोसायटीची भिंत कोसळली. आसपासचा परिसरातील जमीन खचली, ज्यामध्ये मजुरांच्या झोपड्या जमीनदोस्त झाल्या आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: