पुणे विभागात कोरोना बधितांची संख्या झाली 1344,आजपर्यंत 94 मृत्यू ,1702 रुग्ण झाले बरे- विभागीय आयुक्त

ग्लोबल न्युज: पुणे विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1702 झाली आहे.विभागातील 264 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. अॅक्टीव रुग्ण संख्या 1344 आहे.विभागात कोरोनाबाधीत एकुण 94 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 80 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत.

सोलापुरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 81 झाली असून काल ही आकडेवारी 68 होते आज त्यामध्ये तेरा रुग्णांची भर पडली आहे तर सहा मृत असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातून देण्यात आली आहे.

पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1538 झाली आहे. 230 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरीगेले आहेत. अॅक्टीव रुग्ण संख्या 1223 आहे. पुणे जिल्हयात
कोरोनाबाधीत एकुण 85 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 79 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत.

जिल्हा / मनपा | बाधीत रुग्ण / मृत्यू
1 पुणे- 1538 85
2 सातारा- 41 02
3 सोलापूर- 81 06
4 सांगली – 30 01
5 कोल्हापूर- 12 00

आजपर्यंत विभागामध्ये एकुण 17747 नमूने तपासणीसाठी पाठविणेत आले होते त्यापैकी 16908 चा अहवाल प्राप्त आहे. 839 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त
अहवालांपैकी 15151 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 1702 चा अहवाल पॉजिटिव्ह आहे.

विभागीय आयुक्त कार्यालय,पुणे

नवीन कोरोना विषाणू (कोविड-19) सद्य:स्थिती व उपाययोजन

प्रेसनोट(संध्या 4.00 वाजेपर्यत)

पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1538 झाली आहे.230 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरीगेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1223आहे. पुणे जिल्हयात कोरोनाबाधीत एकुण 85 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 79 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत.

विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1702 झाली आहे.विभागातील 264 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरीगेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1344 आहे.विभागात कोरोनाबाधीत एकुण 94 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 80 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत.आजपर्यत विभागामध्ये एकुण 17747 नमूने तपासणीसाठी पाठविणेत आले होते त्यापैकी 16908 चा अहवाल प्राप्त आहे. 839 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 15151 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 1702 चा अहवाल पॉजिटिव्ह आहे.

आजपर्यंत विभागामधील 59,91,999 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 2,29,48,395 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 1375 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: