पिकविमा कंपन्याकडून मदत देण्यासाठी प्रयत्नशील – कृषी आयुक्त सुहास दिवसे

अवकाळी पाऊस नूकसान शासनाच्या मदतीला मर्यादा असल्याने पिकविमा कंपन्याकडून मदत देण्यासाठी प्रयत्नशील – कृषी आयुक्त सुहास दिवसे

बार्शीत कृषी पदवीधर मंडळाचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

बार्शी : यंदा कधी नव्हे तो अवकाळी जास्त दिवस पडला या अवकाळी पावसाने 94 लाख हेक्टरवरील पिंकांचे नूकसान झाले आहे़आम्ही मेहनत घेऊन महिनाभर पंचनामे करण्याचे काम केले़ शासनाने दिलेली ही मदत तोकडी असल्याचे कबुल करत शासनाला नुकसान देण्याला ही मर्यादा आहे़ ,राज्यात ३६ लाख शेतकऱ्यांचे पंचनामे केले आहेत़ विमा कंपन्याकडून मदत मिळावी यासाठी वैयक्तीक पंचनामे केल्याचे सांगत विमा कंपन्याकडून मदत मिळण्यासासाठी शासन प्रयत्नशिल असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी केले़

ते येथील कृषी पदवीधर विश्वस्त मंडळाच्या वतीने आयोजित जागर समृध्द ग्रामविकासाचा या कार्यक्रमामध्ये अध्यक्षस्थानावरुन बोलत होते़

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महावितरणचे कार्यकारी संचालक सुरक्षा व अंमलबजावणी दत्तात्रय शिंदे, सेवानिवृत्त सनदी अधिकारी दिनकरराव जगदाळे,
विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, कृषी उपसंचालक रविंद्र माने प्रकल्प संचालक आत्मा मदन मुकणे, गटविकास अधिकारी शेखर सावंत,तालुका कृषी अधिकारी शहाजी कदम, तंत्रअधिकारी मधुकर
कोल्हे,जिल्हा उपनिबंधक शिरीष कुलकर्णी, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष सयाजीराव गायकवाड,सचिव बी़डी़ कदम आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना दिवसे म्हणाले, मृदा व जलसंधारणापेक्षाही कृषी विस्ताराचे कार्य महत्वाचे आहे़ आम्ही जगातील सर्वोत्कृष्ठ तीस संस्थांशी करार करुन जगातील सर्वोत्तम कृषी तंत्रज्ञानमहाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्नशिल आहोत़ गटशेतीच्या माध्यमातून अनेक शेतकरी उत्पादक कंपन्या निर्माण करुन मुल्यवर्धीत साखळी तयार केली आहेक़मी पाण्यावर येणाऱ्या सिताफळ व पेरुसारख्या फळ

िपकांवर प्रक्रिया करुन अर्थिक उन्नती साधली पाहिजे़ जल,जंगल,जमीन,जनावरे व माणूस यांचा सर्वंकष विचार होणे ही काळाची गरज असल्याचे ते म्हणाले़ शेतीकरत असताना शेतकऱ्यांनी कमी खर्च करुन जास्तीचे उत्पादन घेण्याचे तंत्रज्ञान अवगत केले पाहिजे असे सांगत शेती व्यवसायाला ग्लॅमर तयार करुन मार्केटिंग करणे ही देखील काळाची गरज बनली आहे़ राज्य शासनाच्या स्मार्ट प्रोजेक्ट अंतर्गत जागतिक बँकेच्या सहाय्याने कृषी उद्योजकतेतून ग्रामीण पुनरुर्थान होणे अपेक्षितआहे़

दत्ता शिंदे यांनी शेतकऱ्यांचा विकास झाल्याशिवाय देश बलवानहोणार आहे़ सर्व समाजघटकांनी शेतीच्या प्रगतीसाठी प्रयत्नकरणे गरजेचे आहे़.पाणीफांऊडेशनसारख्या स्पर्धा या सातत्याने झाल्या पाहिजेत़ बार्शी तालुक्यात ही स्पर्धा यशस्वीपणे राबविली गेली त्यामध्ये कृषी पदवीधरांचे योगदान हे महत्वाचे आहे़ गाव एक झाल्यास त्याचे परिणाम काय होतात हे सुर्डीने राज्याला दाखवूनदिले आहे़ 

दिलीप झेंंडे यांनी आपल्या भाषणात बार्शी तालुक्यातील शेतकरी हे प्रयोगशील असून येथे कृषीरत्नांची खाण आहे़ कृषी सहाय्यकांने शेतकऱ्यांना पिकं घेण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करावे असे ते म्हणाले़

अंकुश शिंदे म्हणाले की, मी जरी अधिकारी असलो तरी स्वत: शेतीमध्ये सतत वेगवेगळे प्रयोग करीत असतो़ शेतकऱ्यांनी ही आपली शेती सुधारण्यासाठी प्रयोगशिल शेतकऱ्यांच्या शेतीला भेटी देऊन नवीन काय ते आपल्या शेतात करावे असे सांगीतले़

 प्रास्ताविकात अध्यक्ष सयाजीराव गायकवाड यांनी मंडळाच्या वाटचालीचा व घेण्यात घेणाऱ्या
उप्रकामांची माहिती दिली़ आभार जयराम गोले यांनी मानले़

सुत्रसंचलन वर्षाराणी साखरे यांनी केले़ कार्यक्रम यशस्वीकरण्यासाठी दत्तबाळ आरनाळे, राजकुमार चापले, श्रीकांत राखुंडे, संस्थेचे सदस्य डॉ़ ज्ञानेश्वर पाडूळे, सुधीर काशीद, दिपक भड, उमेश पवार, विलास मिस्किन, नितीन विश्वेकर, जयराम गोले,

नानासाहेब साखरे ,सोमनाथ घोडके,सोमनाथ साठे, आनंद पाटील,अशोक इनामदार यांनी परिश्रम घेतले़

ग्लोबल न्युज नेटवर्क: