पावसाअभावी शेतक-याने फिरवला पिकावर नांगर

उस्मानाबाद/राजा वैद्य –

उस्मानाबाद जिल्हयात पुरेसा पाऊस नसल्यामुळे पिकांची वाढ खुंटणे, सोयाबीन पीकाला लागलेली फुले गळून पडणे, पीके वाळून जाने आदी विविध कारणामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला असून येणारी रब्बी तरी पदरात पडावी, तो पर्यंत जमिनीची चांगली मशागत करावी या उद्देशाने लावलेले सोयाबीन  पीकावर नांगर फिरवून शेतकरी जमिन मोकळी करीत आहेत. अपु-या पावसामुळे शेतक-यांचे अथक परिश्रम तर वाया गेलेच तर पेरणीसाठी केलेला खर्च धुळीला मिळाला आहे.

उस्मानाबाद जिल्हयाची एकुण पावसाची वार्षीक सरासरी ७६७.४६ मीमी इतकी आहे. परंतू पावसाळयातील तीन महिने संपत आले तरी अद्याप अपेक्षीत पाऊस झालेला नाही. जिल्हयात एकुण आतापर्यत २१ ऑगस्ट २०१९ पर्यंत २५४.४७ मीमी पाऊस झाला आहे. गतवर्षी याच कालावधीत ३७३.४५ मीमी पाऊस झाला होता. यावर्षी पडलेंल्या पावसाची वार्षीक सरासरी ३३.१६ टक्के इतकी आहे. त्यामुळे अपु-या पावसाअभावी पीके वाळून जात आहेत. त्यामुळे निराश झालेला शेतकरी पुढील दिवस कसे घालायचे याची चिंता करीत आहेत.

कळंब तालुक्यातील मोहा येथील सुधाकर झोरी यांनी ८ एकर मध्ये सोयाबीन लावले होते.८ एकर मध्ये सोयाबीन लावण्यास एकुण खत, बीयाणे, मशागत यावर एकुण ५५ हजार रूपये खर्च आला होता. परंतू पुरेशा पाऊस न झाल्यामुळे वाढ खुंटलेल्या सोयाबीन पीकावर त्यांनी ट्रॅक्टरच्या मदतीने नांगर फिरवला. या मोहा सर्कल मध्ये २१ ऑगस्ट २०१९ पर्यंत फक्त १४४ मीमी पाऊस झालेला आहे. त्यामुळे या भागातील अनेक शेतक-यांनी आपल्या वाळत चाललेल्या पिकांवर नांगर फिरवला आहे.

पीक विम्याची पेरणीत खर्च 

खरीपाच्या पेरणीच्या वेळेस २०१७-१८ सालचा पीकविमा मिळाला होता. मिळालेला ४५ हजार रूपयाचा पीकविमा आणि जवळचे कांही असे ५५ हजार रूपये सोयाबीन पेरणीवर खर्च केले. त्यानंतर कमी झालेल्या पावसामुळे पीके वाळत असल्याने जमिन मोकळी करण्यासाठी प्रति एकरी १२०० रूपयाने शेतकरी जमिनीवर नांगर फिरविताना दिसत आहे. अशी दु:खद कहाणी सुधार झोरी यांनी लोकराज्य दिली. गेल्यावर्षी याच जमिनीतुन सोयाबीनचे दोन लाख रूपये आले होते. त्यामुळे पुढे काय ? खर्च कसा भागवायचा पहिलेच बॅंकेचे कर्ज आहे. आता सावकाराशिवाय पर्याय नाही, अशा प्रकारची प्रतिक्रिया या भागातील शेतक-यांतून येत आहे. 

ग्लोबल न्युज नेटवर्क: