पार्थ पवारांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीची मराठवाड्यातील नेतेमंडळी सक्रिय 

ग्लोबल न्युज नेटवर्क  : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्यातील मतदान मंगळवारी पार  महाराष्ट्रातील १४ मतदारसंघातील मतदान पार पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरातील पुढच्या पिढीचा प्रतिनिधी असलेल्या मावळ मतदारसंघातील उमेदवार पार्थ पवारांच्या प्रचारासाठी संपुर्ण पवार कुटुंबासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यभरातील मातब्बर नेते सक्रिय झाले आहेत़.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. राज्यातील शेवटच्या टप्यात २९ एप्रिल रोजी येथे मतदान होणार आहे. पार्थ यांना शिवसेनेचे उमेदवार विद्यमान खा. श्रीरंग बारणे यांचे तगडे आव्हान आहे.  पार्थ पवारांची ही राजकारणातील पहिलीच निवडणुक असून त्यामध्ये त्याला विजयी करुन लोकसभेत पाठवणे हे राष्ट्रवादीच्या व पवार कुटुंबाच्या दृष्टीने प्रतिष्ठेचे बनलेले आहे़ त्यामुळे अजित पवार यांनी आपली संपुर्ण ताकद या मतदारसंघात लावलेली आहे़ आजवर सुप्रिया सुळे, अजित पवार यांचे बारामती मतदारसंघात लक्ष होते़ परंतू बारामतीचे मतदान झाल्यामुळे या सर्वांनी आपले लक्ष मावळकडे देण्यास सुरुवात केली आहे़ स्वत: शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहीत पवार, अजित पवार, या पवार कुटुंबातील प्रमुखांसह राज्यभरातील राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे, माजी मंत्री आ़ दिलीप सोपल, राणजगजितसिंह पाटील, विजय भाबळे, आ़ राहुल मोटे, संदीप क्षिरसागर,विजयसिंह पंडित अशोक डक, आदी नेतेमंडळींच्या उपस्थितीत मराठवाडा विभाग मेळावा ठेवला आहे़ या माध्यमातून पिंपरी चिंचवड भागात उद्योग व्यवसायासाठी गेलेल्या मतदारांना साद घातली जाणार आहे़ 

पुणे जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ घाटावरचे आणि घाटाखालील भाग समजाला जाणारे पनवेल, कर्जत, उरण विधानसभा मतदारसंघ मावळ लोकसभेत समाविष्ट आहेत.  

admin: