पवार कृषिमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांची पर्वा केली नाही-नरेंद्र मोदी

अकलूज : मोदीच्या रस्त्यावरुन चालणे शरद पवारांना जमणार नाही. ते दिल्लीतील गांधी कुटूंबियांकडून शिकत आहेत. यशवंतराव चव्हाण यांच्याकडून तरी किमान प्रेरणा घेतली तर बरे झाले असते अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा शरद पवारांवर टीका केली. पवार केंद्रात कृषी मंत्री असताना त्यांनी शेतकर्‍यांची पर्वा केली नाही असे ते म्हणाले. 

माढा लोकसभा मतदार संघातील उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारासाठी बुधवारी सकाळी मोदी यांची सभा पार पडली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस, बारामतीच्या उमेदवार कांचन कुल, विजयसिंह मोहिते-पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आदी उपस्थित होती.जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी यावेळी मोदींना सोलापुरी जॅकेट भेट दिले.धनगरी घोंगडे आणि महाराष्ट्रीयन फेटा बांधून मोदी यांचे सत्कार केला तर विजयसिंह मोहिते-पाटलांचा यावेळी मोदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

राम राम मंडळी, अकलूजकरांनो कसे आहात, पंढरपूरचे दैवत विठ्ठल-रुक्मिणी, अक्कलकोट स्वामी समर्थ, सिद्धेश्वर महाराज, अहिल्यादेवी होळकर यांच्या धरतीला मी वंदन करतो, अशा शब्दात त्यांनी मराठी भाषेत आपल्या भाषणाची सुरुवात केली.आम्ही आता शेतकरी, सिंचन योजना, शेतकरी कंपन्या याकडे लक्ष देत असल्याचे मोदी यांनी जोशपूर्ण भाषणात सांगितले. ऊस उत्पादक शेतकर्‍यांना चांगले दिवस येतील याची व्यवस्था आपले सरकार करेल असा विश्‍वास त्यांनी दिला. शरद पवार हे मोठे खेळाडू आहेत पराभव दिसत असल्यामुळे त्यांना आपल्या परिवाराला धक्का न लागता दुसर्‍याचा बळी दिला असेही मोदी म्हणलो. 

राजकीय जीवनातली 50 वर्ष ही फार मोठी असतात. विजयसिंह मोहिते पाटील यांची 50 वर्षाची कारकीर्द आहे. अशा विजयसिंह मोहिते पाटील यांचा सत्कार करण्याचा मान मला मिळाला, हे माझं भाग्य आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांची स्तुती करत सत्कार केला.  यावेळी अकलूज परिसर नागरिकांनी भरभरुन गेला होता.
विजयसिंह मोहिते पाटलांचा सत्कार करणे हे माझं भाग्य 

विजयसिंह मोहिते पाटील पहिल्यांदाच भाजपच्या मंचावर

शरदराव यांनी मैदान का सोडल 

शरद पवार कृषी मंत्री असताना त्यांना शेतकर्‍यांची पर्वा नव्हती

मोदी की रास्ते पवार चल नही सकते

देशात एकच विरोधकांची घोषणा मोदी हटावा मोदी हटाव

मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही

मुंबई आंतकवाद्यांची स्वर्ग बनला होता

मजबूर सरकार पाहिजे का मजबूत सरकार पाहिजे

admin: