मा.आ.राजेंद्र राऊत काय म्हणतात: तुम्ही हद्द दाखविली! आमच्या कार्यकर्त्यांनी जिद्द दाखविली ! ही बघा गर्दी, गर्दीचा नादच करू नका !

धैर्यशील पाटील

बार्शी :-   राजकारणात आमचा नाद करू नका, तुमच्या सभेत तुम्ही सोमवार पेठेतील जैन मंदिरा पर्रंत गर्दीची हद्द दाखविली. सभेत बोललात, विराट सभा झाली- ऐतिहासीक सभा झाली-मागे अशी सभा कधीच झाली नव्हती अन् पुढेही अशी सभा होणार नाही. ही रेकॉर्ड ब्रेक सभा आहे. असे शब्द आमच्या कार्यकर्त्यांच्या कानावर पडताच आमचा कार्यकर्ता जिद्दीने उठला, जिद्दीने पेटला, अन् कामाला लागला. राजाभाऊ सभा लावाच. गांधी पुतळ्राजवळ सभा लावाच. त्यानी हद्द दाखविली आता आम्ही जिद्द दाखवितो. त्या सभेच्रा रेेकॉर्ड मोडून दोनच दिवसात दाखवितो. म्हणुन माजी आमदार राजेंद्र राऊत रांनी अवघ्या दोनच दिवसात गांधी पुतळ्या जवळ उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाचे शिवसेना-भाजपा रुतीचे अधिकृत उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ सभा लावली. त्रा सभेला कुठलाही राज्य पातळीवरचा प्रमुख नेता नव्हता. कुठलाही स्टार प्रचारक नव्हता. कोणताही स्टार प्रचारक न आणता तुम्हाला जी गर्दीची मस्ती चढली होती. ती मस्ती अवघ्या दोनच दिवसात आम्ही दाखवितो. ही बघा गर्दी. कोणताही नेता नाही. नाद नाही करायचा. केवळ दोन माजी आमदार अन् दोन भाऊ. राजाभाऊ अन् विश्‍वासभाऊ यांच्या हाकेला ओ देत आलेला माझा अस्सल जनसमुदाय बघा, तुम्ही तर गर्दीची हद्द दाखविली ही माझ्या कार्यकर्त्यांनी जिद्द दाखविलेली आहे. 

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना भाजपा रासप महायुतीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ जुना गांधी पुतळा येथे आयाजित सभेत ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून योजना राबविल्या

सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात विविध विकास योजना राबविल्या आहेत. त्याचा लाभ देशभरातील सर्वसामान्य, गोरगरीबांना होत आहे. विविध योजनांमधील दलाल हटवून थेट लाभार्थ्याच्या खात्यात योजनांचा लाभ दिला जात आहे. त्यामुळे अनेकांच्या पोटात दुखत आहे. पंतप्रधान मोदी यांनी कणखर भूमिका घेतल्याने जगभरात भारताची ताकद निर्माण झाली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून बार्शी तालुक्यालाही मोठा लाभ मिळाला आहे. या निवडणूकीवर देशाचे भवितव्य अवलंबून असून महायुतीच्या खंबीरपणे पाठीशी उभे रहा असे आवाहन केले.

राऊत म्हणाले, केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून बार्शीसाठी मोठा विकास निधी मिळत आहे. एमआयडीसी सह बार्शी उपसा सिंचन योजना पूर्णत्वास गेलयानंतर तालुक्याचा कायापालट होणार आहे. यामुळे अनेक युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. एमआयडीसीचे काम प्रगतीपथावर असून वर्षभरात कार्यान्वित होईल. उपसा सिंचन भूसंपदानाच्या कामासाठीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी ४६ कोटी रूपयांची तरतूद केली. त्यामुळे कामे मार्गी लागणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मंत्र्यांचे तालुक्याच्या विकासासाठी चांगले सहकार्य लाभत आहे. त्यामुळे महायुतीला साथ दया असे आवाहन त्यांनी केले. राजकीय प्रतिस्पर्ध्यांवर त्यांनी नांव न घेता टीका केली.

सांगोल्याचे माजी आमदार शहाजी पाटील म्हणाले, ३५ वर्षे काँग्रेस मध्ये घालवली, काही मिळाले नाही. राष्ट्रवादीत मात्र एकाच घरातील अनेकांना पदे आहेत. या मंडळींनी अल्प काळात स्वविकास साधला अशी टीका केली. मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर तत्कालीन सरकारने फक्त पत्र लिहीले. मोदी यांनी पुलवामा हल्ल्याचा लगेच बदला घेण्याची भूमिका घेतली. मोदी हे कणखर नेतृत्व असल्याचे सांगितले.

माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले म्हणाले, बाजार समितीतील सत्तेच्या माध्यमातून जलसंधारणाच्या कामासाठी दरवर्षी तीन कोटी देण्याचे निश्चित केले आहे. त्यातून तालुक्यात जलसंधारणाची चांगली कामे होऊन शेतकऱ्यांना याचा फायदाच होणार आहे. 

माजी नगराध्यक्ष असिफ तांबोळी म्हणाले, सरकारच्या सहकार्यामुळेच विविध योजनेअंतर्गत पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून शेकडो घरकुले मंजूर आहेत. शेकडो कोटी रूपयांच्या या निधीतून गरीबांना हक्काचे घर मिळणार आहे. शहराचा विकास विरोधकांच्या डोळ्यात खुपत आहे, त्यामुळेच टीका होत आहे. त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका असे आवाहन केले.
जयप्रकाश राजेनिंबाळकर यांनी ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना साथ देण्याचे आवाहन केले.
यावेळी केशव घोगरे, धनंजय जाधव, मेजर मोरे, संतोष निंबाळकर, बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, संजय पाटील, विजय राऊत, संतोष निंबाळकर, रावसाहेब मनगिरे, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, छोटुभाई लोहे यांच्यासह पदाधिकारी, नेते उपस्थित होते.

admin: