पवारांच्या घराकडे जाऊ नका,ते कधी टांग लावतील याचा नेम नाही-दिलीप सोपल

बार्शी: बार्शी शहर व तालुक्यातील आजची ही प्रचारसभा ही ऐतिहासिक सभा असून दहा हजार वर्षात अशी सभा झालो नाही.यातून पवार व सोपल कुटूंबियांवरील प्रेम दिसून येते. पाच वर्षात आपण फसवले गलोे. घोषणांच्या पावसामुळे खरा पाऊस ही येईना झालाय अशी मिश्किल टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि स्टार प्रचारक आमदार दिलीप सोपल यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. बार्शीतील जुन्या गांधी पुतळयाजवळ ही सभा झाली.

सोपल म्हणाले,पूर्वीचे सरकार बरे होते असे म्हणायची वेळ आली. शेतमालाला भाव नाही.त्यामुळे शेती उद्योगावर अवलंबून असलेली जनता उद्योग धंदे अडचणीत आले. हा वसंत दादा आणि शरद पवारांचा महाराष्ट्र आहे. सुसंस्कृत नेते पवारांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत. सर्व वर्ग खुश आहेत असा उपरोधिक टोला हाणला. लाज वाटावी अशी बेताल वक्तव्ये विरोधी पक्षातील मंडळी करत आहे. आम्ही सर्वाना मदत करतो. विनाकारण पवारांच्या घरावर काही लोक बोलत आहेत.पण हे पवार साहेब आहेत कधी कुणाला टांग लावतील याचा नेम नाही. बेडकाने सुद्धा लाजावे अशी परिस्थिती. उड्या मारायची स्पर्धा लागलीय.कोण कुठे उड्या मारतोय काही समजेना . कोणत्या पक्षात किती दिवस राहायचे याचा करार केला जात आहे. महाराष्ट्रातील जनतेचा एकमेव तारणहार शरद पवार आहेतअसे ही सोपल शेवटी म्हणाले.

admin: