पती पत्नीचं नातं कस असावं ; वाचा सविस्तर-

पतीपत्नीच्या नात्याला कुठल्याच नात्याची सर येत नाही. खरं कि नाही! टॉम अँड जेरी सारखं वागून सुद्धा सतत बहरत जात. संसाराच्या वेलीला हळूहळू फुलं लागतात आणि सगळंच सुगंधित होऊन जात. एखाद्या दिवशी नवरा मित्र वाटतो तर दुसऱ्या दिवशी वैरी. दोन विभिन्न विचारांचे आणि शरीराचे व्यक्ती एकाच नात्यात गुंतलेले असतात. आणि तो गुंता पतीपत्नीच्या सुरेख नात्याचा असतो… “ये मोह मोह के धागे तेरी उँगलियों से जा उलझे…..”

“दिमाख कुठे पेंड खायला गेलं होत कोण जाणे, ह्या असल्या माणसाशी लग्न केलं मी, मला काय स्थळांची कमी होती, जन्माचा वैरी नशिबाने भेटलाय.” शेजारच्या काकू रडू रडू बोलत होत्या. ऐकून मलाही हसावं कि काय अस्संच झालं. मीही मज्जा म्हणून घरातून आवाज दिला, “काकू काय झालं”, “काय सांगू तुला, दुष्मनाशीच लग्न झालंय माझं.” काकू रडतंच म्हणाल्या, “जाऊ द्या ना काकू, खुप प्रेम आहे, हो, काकानचं, तुमच्यावर”. मी अगदी मनातून बोलली. “कसलं प्रेम, वीस वर्ष झाले लग्नाला, मी म्हटलं आता मुरेल हा माणूस, पण कसलं, अजूनही वैरी आहे माझा. मला नेहमीच धारेवर धरण्यासाठी तयार असतो. कधी एका शब्दाचं कौतुक नाही, पण चुका मोजायला नेहमी तयार.” काकू हुंदके देतं आणि स्वयंपाक करता करता कुरकुरत होत्या.

पंधरा दिवसा आधीचीच गोष्ट होती, शेजारच्या काकू काकांचा २० वा लग्नाचा वाढदिवस मोठ्या थाटात झाला होता. तेव्हा काकू काकांची फार स्तुती करत होत्या. आणि ते खरंही होत. त्या म्हणाल्या होत्या कि, “लग्नानंतर नवऱ्याच्या रूपात जिवाभावाचा दोस्त भेटला मला, यांनी साथ दिलं म्हणून मी नोकरी करू शकले.” अजूनही त्या दोघांचं कार्यक्रमातलं संभाषण माझ्या मनातून जात नव्हतं आणि आज अचानक हे एकल तेव्हा हे नेमकी काय व्याख्या असायला पाहिजे पतीपत्नीच्या नात्याला उमगतच नव्हतं.

मनातल्या मनात हसतं, मी आपली आत आले, आणि स्वयंपाकाला लागले, माझं मिक्सर काम करत नव्हतं, ह्यांना म्हटलं, “जरा मिक्सर बघा ना. मी भाजी कापून घेते. तर पतीदेव पटकन बोलले, “साधं मिक्सर तुला बघता येत नाही, एवढ्या डिग्र्या लावतेस ना नावासमोर”. हे एकल्यावर माझाही पारा भडकला, आता इथे माझी डिग्री कशी काय आली, असं म्हणतच भांडायला मी समोर गेले. महाशय बेडवर लोळून मोबाईल वर गेम खेळत होते. चांगलेच चिडले मी, तर मला म्हणतात, “बरोबर तर आहे, इंजिनीर आहेस ना! तेवढंही जमत नाही. तुझे आई बाबा तर मोठे सांगतात…. आमची मुलगी इंजिनीर आहे, तिला सगळं येत.”

शब्दाला शब्द एवढे वाढले, दोन दिवस एकमेकांकडे बघणंही बंद. जसे जन्माचे वैरी याच जन्मात भेटला. मग काय, “दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है, उम्र भर का गम हमें इनाम दिया है…… ” अशी परिस्थिती होती.

पण काय करता, जाणार कुठे, तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना अशी गत. त्यातल्या त्यात पाण्यात राहून मगराशी वैर कोन घेणार. एकमेकांशी कितीही ठरवलं, तरी एका घरात बोलावच लागते, झालं, हळु हळू बोलणं सुरु.

दोन दिवसांनी मिक्सर बरोबर करून दिला, सांगताना मलाही समजून सांगितला, मीही गुमान एकूण घेतलं.

दुसऱ्या दिवशी, ऑफिस मधून येताना, सहज शेजारच्या काकू कडे डोकावलं तर काका काकू चहा पीत गप्पा मारत होते. जणू दोन जिवाभावाचे मित्र रमून गप्पा करत होते. मीही मस्करी केली, काय काका आज घरी, “अग हिला नाटक बघायला घेऊन गेलो होतो, त्याच्याच गप्पा चालू आहेत, काका हसूनच बोलले.” मीही म्हटलं, “कुठलं”? दोघेही एकदम बोलले, “तुझं माझं जमेना” … आणि कुणालाच हसू आवरलं नाही.

मी हसतच घरात पाय ठेवला, तर, आमचे पतीदेव चक्क लवकर घरी, आणि घरातून अद्रकच्या चहाच सुगंध येत होता. घरात आल्याआल्या गरमागरम चहा मिळाला, ह्यांनी मला तयार व्हायला सांगितलं, आणि आम्ही बाहेर निघालो, मीही विचारलं नाही, कुठे जातोय म्हणून, दोघही काका काकूंच्या, ऑफिसमधल्या गप्पा करत होतो. वेळ कसा निघून गेला कळलंच नाही. अचानक, हे मला म्हणाले, “उत्तर इथेच”, मी गाडीतून बाहेर उतरले तर सामोरं नाट्य सभागृह होत आणि बोर्ड लागला होता “तुझं माझं जमेना.”..

एक अनोळखी नातं, पण, आपली स्वतःची जबरदस्त ओळख बनवतं.रक्ता पलीकडल, पण, दोघांच्याही धमन्यांन मधून रक्त बनून वाहत, भूतकाळ नसलेलं, पण भविष्यासाठी भक्कम असलेलं, नाजूक, पण न तुटणार. जगातलं अतिशय पवित्र नातं, मनापासून ते शरीरापर्यंत निभवलं जातं.कधी दोस्त तर कधी दुश्मन म्हणून आयुष्याच्या प्रवासात शेवटपर्यंत सोबत असतं

पती पत्नीचं नातं

सर्व विवाहित जोडप्यांना समर्पित!

ग्लोबल न्युज नेटवर्क: