पंकजा आणि डॉ प्रीतम मुंडे यांनी घेतली उध्दव ठाकरे यांची भेट

मुंबई:–

लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला मिळालेल्या अभूतपूर्व विजयाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे आणि बीडच्या नवनिर्वाचित खासदार डाॅ प्रितम मुंडे यांनी आज मातोश्री निवासस्थानी जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे व रश्मीताई ठाकरे यांची भेट घेतली.

राजकीय जेष्ठत्व,कौटुंबिक जिव्हाळा आणि आपुलकीच्या नात्याने मार्गदर्शन करणारे मोठे भाऊ उद्धवजी ठाकरे आणि रश्मी वहिनींना युतीला मिळालेल्या अभूतपूर्व विजयाच्या शुभेच्छा देवून आशीर्वाद घेतले.

admin: