पळसनाथ मंदिर प्राचीन वास्तूकलेचा उत्तम नमुना

इंदापूर – दुष्काळामुळे उजनी पात्रातील पळसनाथ मंदिर पूर्णपणे पाण्यातून बाहेर आले आहे. पळसदेव गावातून आत उजनीच्या पात्राकडे ३ किमीच्या आसपास गेले की हे मंदिर आहे. पुणे – सोलापूर हायवे वरून हे मंदिर दिसते. भिगवन पासून सुमारे २० किमी अंतरावर हे मंदिर आहे. तर पुण्यातून १२५ किमी अंतर आहे.

मंदिरात जायचं म्हणल की, तुम्हाला छोट्याश्या होडीनेच जावे लागते. होडीत बसल्यानंतर आपण जसे जसे मंदिराच्या जवळ जातो तसे तसे ते मंदिर आपल्याला अजूनच आकर्षित करत राहते. त्याची भव्यता आपल्याला दिसायला लागते. हे मंदिर हेमाडपंथी असून सुमारे १० व्या शतकातील आहे.

संपूर्ण मंदिर मोठं मोठे दगड, शिळा, पक्क्या विटा, चुना आणि त्यावर नक्षी काम करून हे मंदिर बनवले आहे. यामुळे हे मंदिर बघताना तुम्हाला खूप साऱ्या इतिहासातील गोष्टी पाहायला मिळतील. भीमा नदीचे पाणी या मंदिराला येऊन धडकत असते. त्यांनतर उजनी जस-जसे भरत जाईल तसे हे मंदिर पाण्याखाली जाते.

मंदिरात तुम्हाला चौकोनी खांब, वतुर्ळाकार पात्रे, त्यातच पुष्प, नट, स्तंभ, लवा, बेल अशा पंचशाखा सुस्थितीत दिसून येतात. शिल्प मूर्तींमध्ये प्रामुख्याने दशावतार, शंकर-पार्वती, तीन वीरगळी, रामायण-महाभारतकालीन कलाकृती, इंद्राच्या दरबारात असणाऱ्या देवीदेवतांची शिल्पे, त्या काळातील अप्रतिम कोरीव काम, जडणघडण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. गभाऱ्यासमोर नंदी आहे.

गेली अनेक वर्ष हे मंदिर पाण्याखाली असून देखील चांगल्या स्थितीत आहे. हा प्राचीन वास्तू कलेचा हा उत्तम नमुना आहे. मंदिराच्या संपूर्ण बाजूला दगडाची तटबंदी आहे. परंतु त्याची पडझड झालेली आहे.

तस तर याबद्दल मला काही जास्त माहिती नाही. परंतु अनेकजण या ठिकाणी फिरण्यासाठी , फोटोशूटसाठी, काही ठराविक लोक संशोधनासाठी येत असतात…

admin: