नौकरी पाहिजे ,बार्शीतील सी. एम. स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबीराला नक्की या, केव्हा ते वाचा सविस्तर-

भाजपा नेते राजेंद्र मिरगणे यांच्या संकल्पनेतून नोकरी इच्छुक युवा वर्गासाठी उपक्रम

नुतन जलसंधारण मंत्री प्रा.तानाजीराव सावंत यांचा भव्य सत्कार होणार

बार्शी :  राज्य व केंद्र शासनाच्या लवकरच होणा-या ७२ हजार पेक्षा अधिक विविध पदांच्या नोकरी भरतीसाठी सर्व संवर्गातील युवक युवतींना ऑनलाईन स्पर्धा परिक्षेतील सर्व विषयांवर सखोल मार्गदर्शन करणा-या सी. एम. स्पर्धा परिक्षा मोफत मार्गदर्शन शिबीराचे दि.७, ८ व ९ जुलै रोजी यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी १०.०० ते ६.००

यावेळेत आर. एस. एम. समाजसेवा संस्था व भारतीय जनता पार्टी बार्शी शहर व तालुका यांच्या वतीने आयोजन केले असल्याची माहिती संयोजक व महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांनी पत्रकारपरिषदेत दिली. 

 यावेळी मिरगणे म्हणाले तालुक्यातील एकंदरीत दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता नोकरी इच्छुक युवा वर्गासाठी मोफत नामवंत व तज्ञ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देणे व महानगरांच्या धर्तीवर त्यांची या परिक्षासाठी पुर्व तयारी करवुन घेणे हा या शिबीराचा मुख्य उद्देश आहे. सामाजिक जाणिवेतून आजपर्यंत स्वखर्चाने राबवलेल्या विविध समाज उपयोगी उपक्रमांची मालीकाच या शिबीराच्या माध्यमातून पुढे जात आहे.

दि. ७ जुलै रोजी राज्याचे नुतन जलसंधारण मंत्री प्रा.तानाजीराव सावंत यांच्या शुभहस्ते या शिबीराचे उद्घाटन होणार आहे. यावेळी मंत्री पदी निवड झाल्याबद्दल ना. सावंत यांचा बार्शीकर व आर.एस.एम समाजसेवा संस्था यांच्या वतीने भव्य सत्कार समारंभ होणारआहे. या कार्यक्रमानंतर सलग तीन दिवस हे मार्गदर्शन शिबीर होणार असून या शिबीरात इंग्रजी विषयावर प्रा.रजेश

आगरवाल तसेच चालू घडामोडी या विषयावर प्रा.रमाकांत कापसे तसेच अंकगणित व बुध्दीमत्ता चाचणी या विषयावर डॉ. विजय पोवार तसेच मराठी व्याकरण विषयावर प्रा. सुनिल शेळगावकर, तसेच भूगोल विषयावर डॉ. विलास कांबळे,

तसेच स्पर्धा परिक्षेला सामोरे जातानाचे आव्हाने या विषयावर प्रा.सचिन आतकरे तसेच बार्शीचे सुपुत्र व झारखंड येथे जिल्हाधिकारी म्हणून  कार्यरत रमेश घोलप, बीडचे अप्पर पोलीस अधिक्षक विजय कबाडे, सनदी अधिकारी अविनाश सोलवट, तहसिलदार धिरज मांजरे, आदी वरीष्ठ अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.

हे शिबीर पुर्णपणे विनामुल्य असून अधिकाधिक विद्यार्थी व सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन मिरगणे यांनी यावेळी केले.

 शिबीराच्या यशस्वीतेसाठी सौ.प्रतिभा मुळीक, संदीप देशमुख, पंडीत मिरगणे, अमर आवटे, शिरीष घळके, अॅड. नितीन सोडळ,कुणाल घोलप,रविंद्र सांगोळे, शरीफ शेख, महेदिमियाँ लांडगे, अविनाश शिंदे, शिवाजी खोडवे, अतिष बिसेन, संभाजी सोनवणे आदी परिश्रम घेत आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: