निरंजन भूमकर यांच्या प्रचारार्थ बार्शीत आज शरद पवारांची सभा

बार्शी: बार्शी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निरंजन भूमकर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रसेच अध्यक्ष शरद पवार यांची बार्शीतील जुना गांधी पुतळा येथे जाहीर प्रचार सभा होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस विक्रम सावळे यांनी दिली़

जुना गांधी पुतळा येथे आज शनिवार रोजी सकाळी दहा वाजता ही सभा होणार आहे़ यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, माजी आ़ राजन पाटील, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील उपस्थित रहाणार आहेत़ या सभेसाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने विकास पाटील यांनी केले आहे़.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi

ग्लोबल न्युज नेटवर्क: