या पंतप्रधानांना जाहीर झाला यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार; वाचा सविस्तर-

ओस्लो । 2019 चा शांततेचा नोबेल पुरस्कार इथिओपियाचे पंतप्रधान अबिय अहमद अली (43) यांना जाहीर झाला आहे. अबिय अहमद अली यांनी शेजारील देश इरिट्रियाशी सीमा विवाद संपवण्यासाठी पावले उचलली. या प्रयत्नांसाठी नॉर्वेजियन नोबेल समितीने अबिय यांना नोबेल पुरस्कार दिला.

नॉर्वेजियन नोबेल समितीने शांतता आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी अबिय अहमद यांना नोबेल देऊन सन्मानित केले. अबी यांना नोबेल जाहीर झाल्याने इथिओपिया आणि पूर्व व उत्तर-पूर्व आफ्रिकी प्रदेशात शांततेसाठी प्रयत्नशील असलेल्या इतरांनाही ओळख मिळाली आहे.

सैन्यात गुप्तचर अधिकारी होते अबिय अहमद अली

अली हे सैन्यात एक गुप्तचर अधिकारी होते. त्यांनी देशात मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि राजकीय सुधारणांची अंमलबजावणी केली. इथिओपियाचा शेजारचा देश इरिट्रियाबरोबरचा 20 वर्षे जुना सीमा वाद मिटवण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

त्यांना नोबेल देण्यासाठी हेच कारणीभूत ठरले. अबिय 2018 मध्ये पंतप्रधान झाल्यावर त्यांनी स्पष्ट केले होते की, ते इरिट्रियाबरोबर शांतता चर्चा पुन्हा सुरू करतील. इरिट्रियाचे राष्ट्राध्यक्ष इसायस अफवेर्की यांच्यासमवेत अबिया यांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी अथक कार्य केले३ दोन्ही देशांमधील दीर्घकाळ सुरू असलेला वाद मिटवला.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi

ग्लोबल न्युज नेटवर्क: