नातेवाइकांनी सुरू केली होती अंत्यविधीची तयारी, आईचा टाहो ऐकून जिवंत झाला ब्रेनडेड मुलगा

एकीकडे नातेवाईकांनी त्याच्या अंत्यविधीची तयारी सुरू केली होती.

नवी दिल्ली | आई आणि तिच्या लेकराचे नाते खूप निर्मळ आणि निस्वार्थ असते. जे आपण शब्दात मांडू शकत नाही. आई आपल्या मुलासाठी काहीही करायला तयार असते. अशीच एक घटना समोर आली आहे. आईचा टाहो ऐकून एक डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषित केलेला मुलगा जिवंत झाला आहे.

18 वर्षांच्या एका मुलाला रुग्णालयात ब्रेनडेड घोषित करुन कुटुंबाकडे सोपवण्यात आले होते. कोमानंतर ब्रेनडेड झालेल्या मुलाच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती. तेव्हाच चमत्कार घडला. आईचा टाहो ऐकून या मृत मुलाच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. हे पाहून आईने डॉक्टरांना बोलावले आणि तीन दिवसांच्या आत या मुलाची तब्येत सुधारली.

तेलंगानामध्ये सूर्यापेट जिल्ह्याच्या पिल्लालमैरी गवात राहणाऱ्या 18 वर्षांच्या गंधम करिन याला 26 जूनला ताप आला होता. ताप आल्यानंतर त्याला उलटीचा त्रास झाला. यामुळे त्याला सूर्यापेटच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 28 जूनला त्याची प्रकृती जास्त बिघडली यामुळे त्याला हैदराबादमधील खासजी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हैदराबादमधील रुग्णालयात तो 3 जुलैपर्यंत कोमामध्ये होता. यानंतर डॉक्टरांनी तो ब्रेनडेड झाल्याचे घोषीत केले. तो आता वाचू शकत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. किरणला लाईफ सपोर्ट् सिस्टिमवर ठेवण्यात आले होते. डॉक्टरांनी सिदाम्माला ही सिस्टिम काढून मुलाचा मृतदेह घरी घेऊन जाण्यास सांगितले. पण आईने लाईफ सपोर्ट् सिस्टिमसह मुलाला गावच्या घरी आणले. माझा मुलगा शेवटच्या श्वासापर्यंत घरामध्येच राहिल असे आई म्हणाले.

एकीकडे नातेवाईकांनी त्याच्या अंत्यविधीची तयारी सुरू केली होती. त्याच्या चितेसाठी लाकडे आणण्यात आली. नातेवाईक रात्रभर रडत होते. याच वेळी आई मुलाच्या बाजूला बसून रडत होते. आईचा टाहो ऐकून चक्क या मुलाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ब्रेनडेड झालेला मुलगा रडत असताना आईने पाहिला.

आईने लगेच स्थानिक डॉक्टर जी. राजाबाबू रेड्डी यांना बोलावले. त्यांनी तपासले तेव्हा किरणची नाडी मंदगतीने सुरू होती. मग त्यांनी तात्काळ हैदराबादमधील त्याच्या डॉक्टरांशी संपर्क साधला. त्यांना परिस्थितीची माहिती देण्यात आली. त्यांनी रुग्णाला चार इंजेक्शन देण्याचा सल्ला दिला अशी माहिती रेड्डी यांनी दिली. इंजेक्शन देताच मुलाची प्रकृती सुधारली आणि तीन दिवसांनंतर तो आता बोलू शकत आहे.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठीचे फेसबुक पेज लाईक करा.
व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा

ग्लोबल न्युज नेटवर्क: