देशात पुनः NDA चीच सत्ता येणार-विविध एक्झिट पोल चे निकाल

लोकसभा निवडणुकीसाठी आज आज शेवटच्या टप्प्यातील मतदान संपले असून विविध संस्थांनी घेतलेल्या एक्झिट पोलचे निकाल जाहीर झाले आहेत. यातून भारतीय जनता पार्टी आणि NDA यांचीच पुन्हा देशात सत्ता येईल अशी आकडेवारी पुढे येत आहे. मतदानानंतर हे सर्वेक्षण जाहीर झालं आहे. सरासरी 296 जागा एनडीएला मिळतील असा आतापर्यंत जाहीर झालेल्या संस्थांचा एक्झिट पोल चा निकाल आहे.

🔹 टाइम्स नाऊ नुसार भाजपा आघाडीला 306 जागा मिळतील तर सी वोटरच्या मते 287 जन की बात नुसार 305 आणि न्यूज नेशन नुसार 286 जागा भाजप आघाडीला मिळतील अशी शक्यता आहे. तर काँग्रेसला सी वोटरच्या मते 128, जन की बात नुसार 124, टाइम्स नाऊ नुसार 132, न्यूज नेशन नुसार 122 जागा मिळतील .

🔹उत्तर प्रदेशात सपा बसपा युतीला मागील निवडणुकीच्या तुलनेत अधिक जागा मिळतील असे सर्वेमध्ये म्हटले आहे.

🔹 टाइम्स नाव नुसार महाराष्ट्रात 48 पैकी एनडीएला 38 जागा मिळतील तर काँग्रेसप्रणीत यूपीए ला 10 जागा मिळतील. तर इतर संस्थांच्या सर्वेनुसार महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या जागा गतवर्षीच्या तुलनेत वाढतील मात्र याच जागा अधिक असतील असंही म्हटलं आहे.

admin: