देवेंद्र फडणवीस ” सागर ” मध्ये तर भुजबळ पुन्हा ‘ रामटेक ‘ वर राहणार

मुंबई: राज्यामध्ये सरकार स्थापनेनंतर सोमवारी राज्याचे नवे मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना शासकीय बंगल्याचे वाटप जाहीर करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘वर्षा’ बंगल्यावर राहणार आहेत. तर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मलबार हिल येथील सागर बंगल्यावर मुक्काम करणार आहेत. 

राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे ‘रामटेक’ बंगल्यावर राहणार आहेत.  शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे ‘रॉयलस्टोन’ या बंगल्यावर राहणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील ‘सेवासदन’ या बंगल्यावर राहणार आहेत. तर मंत्री सुभाष देसाई, बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांना अद्याप बंगल्याचे वाटप करण्यात आले नाही. 

दरम्यान, मुख्यमंत्री लवकरच वांद्रे येथील निवासस्थान मातोश्री वरुन मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान वर्षामध्ये स्थलांतरित होणार आहेत. वर्षा निवासस्थानी एक कार्यालय आणि एक कॉन्फरन्स रुमही आहे. तेथून ते मुख्यमंत्रिपदाचे कामकाज करणार आहेत. मंत्रीपदावर असेपर्यंत मंत्र्यांना या शासकीय बंगल्यांमध्ये निवास करता येतो. पदमुक्त झाल्यानंतर वाटप केलेले निवासस्थान १५ दिवसांच्या कालावधीत रिक्त करून देणे बंधनकारक असते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: