अध्यक्ष महोदय असे सातत्याने म्हणायलाच हवे का? मुख्यमंत्री ठाकरेंचा फडणवीसांना चिमटा

मुंबई | विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोलेंची बिनविरोध निवड झाली आहे. यानंतर त्यांनी आपला कार्यभार स्वीकारला आहे आणि आज विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरू आहे. यावेळी नाना पटोलेंचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे. यावेळी मुख्यमंत्री ठाकरेंनी माजी मुख्यमंत्र्यांना चांगलाच टोला लगावला आहे. फडणवीसांना विधानसभेत कोणतेही निवेदन करताना ‘अध्यक्ष महोदय’ हा शब्द वारंवार उच्चारण्याची सवय आहे. ते अनेकांनी अनेक वेळा ऐकलेही आहे. त्यावरूनच उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना टोला लगावला. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.

नाना पटोले यांची अध्यक्षपदासाठी निवड झाली. यानंतर ते विधानसभा अध्यक्षपदी स्थानापन्न झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांचं अभिनंदन केले. यावेळी ते म्हणाले की, एका शेतकऱ्याचा पुत्र अध्यक्ष झाल्याने मला खूप आनंद झाला आहे. हे कौतुक करताना त्यांनी फडणवीसांना टोला लगावला. पटोलेंकडे पाहत मुख्यमंत्री म्हणाले की, ‘अध्यक्ष महोदय वारंवार म्हणावंच लागतं का? उद्धव ठाकरेंच्या या प्रश्नानंतर यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.

ग्लोबल न्युज नेटवर्क: