देवपूजेपेक्षा श्रेष्ठ सेवा कोणती ?, यक्षाने धर्मराजाला विचारलेले काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्याची उत्तरं

1) देवपूजेपेक्षा श्रेष्ठ सेवा कोणती ?
उत्तर : आईवडीलांची सेवा ही अधिक श्रेष्ठ.

2) उघड शत्रूपेक्षा अधिक घातक कोण?
उत्तर : कृतघ्न मित्र अधिक घातक.

3 ) गृहस्थाश्रमाचे खरे वैभव कोणते?
उत्तर : त्यागशील आणि सद्गुणांची पत्नी.

4)सर्वात मोठे आश्चर्य कोणते?
उत्तर : आपल्या डोळ्यांसमोर रोज अनेक माणसे मरताना दिसतात, पण आपण मात्र अमर आहोत असे अनेकांना वाटते, हे मोठे आश्चर्य.

5) मानवाचा सर्वात मोठा शत्रू कोणता?
उत्तर : क्रोध राग

6) पृथ्वीपेक्षा गौरवास्पद काय?
उत्तर : आई.

7) गवतापेक्षा अधिक गतीने कोण वाढते?
उत्तर : चिंता – काळजी.

8 ) एकाने काय करावे? दोघांनी काय करावे? तिघांनी काय करावे? चौघांनी काय करावे?
उत्तर : एकाने तप करावे. दोघांनी अध्ययन करावे. तिघांनी चर्चा वा चौघांनी प्रवास.

9) माणसाचा खरा मित्र कोण ?
उत्तर : पत्नी

10 ) मरणाराचा मित्र कोण ?
उत्तर : सत्कृत्य.

11 ) माणसाला अतिशय सुख देणारी वस्तू कोणती?
उत्तर : त्याचे शील, चारित्र्य वा वागणे.

12 ) सर्वात श्रेष्ठ धन कोणते.?
उत्तर : विद्याधन

13) सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता?
उत्तर : कुणाला पीडा होईल असे न वागणे हा सर्व श्रेष्ठ धर्म आहे.

14 ) कुणाशी केलेली तडजोड टिकून राहाते ?
उत्तर : सज्जनाशी.

15) कशाचा त्याग केला असता मनुष्य प्रिय होतो?
उत्तर : अहंकाराचा.

17) श्रेष्ठ दिशा कोणती?
उत्तर : सत्पुरुष ज्या दिशेने जातात ती.

18) जिंकायला कठिण असा शत्रू कोणता?
उत्तर : क्रोध.

19) दुष्टता कोणती ?
उत्तर : सदोदित दुसऱ्या व्यक्तीचे दोष दाखविणे.

संदर्भ – श्रीपांडवप्रताप ग्रंथ

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज
व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा


ग्लोबल न्युज नेटवर्क: