दिशा कडून स्पेशल गिफ्ट मिळाले का विचारताच लाजत आदित्य ठाकरे ने जोडले हात

मुंबई : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि अभिनेत्री दिशा पटानी यांच्यातील डेटींगबद्दल चर्चा सुरु असतानाच आज (13 जून) आदित्य ठाकरेंना पत्रकार परिषदेत दिशाकडून स्पेशल गिफ्ट मिळाले का? असे विचारले असता आदित्य ठाकरे लाजले आणि त्यांनी पत्रकारांना चक्क हात जोडले. 

आदित्य ठाकरे आणि दिशा पटानी या दोघांचाही आज वाढदिवस आहे. 13 जून 1992 ही दिशाची जन्मतारीख आहे, तर 13 जून 1990 ही आदित्य ठाकरे यांची जन्मतारीख आहे. दिशा पटानी आणि आदित्य ठाकरे काही दिवसांपूर्वी डिनर डेटसाठी मुंबईतील एका हॉटेलबाहेर एकत्र दिसले होते. यापूर्वी टायगर श्रॉफसोबत दिसणारी दिशा अचानक आदित्य ठाकरे यांच्यासोबत दिसल्याने नेटिझन्सनी तिला तुफान ट्रोल केले होते.

आज पत्रकार परिषदेत, वाढदिवसाला खास व्यक्तीकडून स्पेशल गिफ्ट मिळाले का, असा प्रश्न विचारला असता, आदित्य ठाकरे लाजले आणि हसत पत्रकारांच्या दिशने हात जोडले. तर डिनर ‘मातोश्री’वर करणार की बाहेर यावर आदित्य पुन्हा लाजत म्हणाले की, डिनर मातोश्रीवरच करणार आहे.

धिरज करळे: