खबर जगाची सकाळच्या हेडलाईन; इंग्लंड : भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात पावसाची बॅटिंग

खबर जगाची सकाळच्या हेडलाईन
गुरुराज माशाळ

किरगिझस्तान: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज घेणार इराणचे अध्यक्ष हसन रुहानी यांची भेट, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाहणं सुद्धा टाळलं.

मुंबई : कोलकात्यात ज्युनियर डॉक्टरला पेशंटच्या नातेवाईकाकडून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज राज्यातील प्रत्येक शासकीय रुग्णालयात मार्डचे निवासी डॉक्टर तसेच ‘अस्मी’चे इंटर्न डॉक्टर्स निदर्शन करणार.

पुणे : ज्येष्ठ अभिनेते व रंगभूषाकार तसेच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी अनंतराव जोशी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने पुण्यात निधन

पुणे: देहूरोडमध्ये नगरसेवकावर अज्ञातांचा गोळीबार.

सोलापूर: जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भाजप प्रवेशासाठी मुंबईत जोरदार हालचाली सुरू, अक्कलकोटचे विद्यमान आमदार सिद्धाराम म्हेत्रे, बबनदादा शिंदे, दिपक आबा साळुंखे, सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे, बाळासाहेब शेळके यांचा समावेश असल्याचे सूत्रांची माहिती.

इंग्लंड : भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात पावसाची बॅटिंग, सामना रद्द झाल्याने दोन्ही संघांना एक-एक गुण देण्यात आली.

धिरज करळे: