नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौऱ्यावरुन परतल्यानंतर अरुण जेटली यांच्या घरी पोहोचले आहेत. मंगळवारी सकाळी पंतप्रधानांनी दिल्लीच्या कैलाश कॉलोनी येथे जाऊन माजी केंद्रीय मंत्री आणि दिवंगत अरुण जेटली यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
पंतप्रधान मोदींनी येथे अरुण जेटलींची पत्नी, मुलगी आणि मुलाची भेट घेतली. त्यांचे सांत्वन केले. यादरम्यान गृहमंत्री अमित शाहही त्यांच्यासोबत उपस्थित होते.
अरुण जेटली यांचे दिर्घ आजाराने 23 ऑगस्ट रोजी निधन झाले होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशापासून बाहेर होते. त्यांनी संयुक्त अरब अमीरात येथून अरुण जेटली यांच्या कुटुंबासोबत बातचित केली होती. पंतप्रधान मोदी सोमवारी रात्री उशीरा तीन देशांच्या दौऱ्यावरुन दिल्लीत परतले. मंगळवारी सकाळी त्यांनी अरुण जेटली यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.
=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.