दादागिरी टायगर ऑफ बंगाल ,Happy Birthday…वाचा सविस्तर-

ज्याने आपल्या दादागिरीने क्रिकेट विश्वात आपली हुकूमत गाजवली; फक्त शांत राहूनच नेतृत्व कराव लागत हा गैरसमज दूर करत आपल्या आक्रमक भूमिकेमुळे ‘भारत क्रिकेटला’ परदेशातही जिंकायला शिकवलं; एक बॅट्समन; एक बॉलर; एक टीम लीडर; एक टीम मालक; एक ऍडमिनीस्ट्रेटर; अशा वेगवेगळ्या भूमिका यशस्वीपणे संभाळलेला एक व्यक्ती…!!

ज्या क्षणी भारतीय संघाच नेतृत्व घेण्यास कोणी धजावत नव्हतं; संघ हा फिक्सिंगच्या चक्रव्यूहात अडकला होता; संक्रमणाच्या स्थित्यंतरावर येऊन ठेपला होता; तेव्हा संघाचे नेतृत्व करत चक्रव्यूह भेदून योग्य मार्गावर आणण्याचं काम केलं व संघास विजयाची चव चाखायला शिकवण्याचं काम केलं; आपल्या आक्रमक नेतृत्वाने गोऱ्या साहेबाच्या देशात आपला दबदबा निर्माण केला..!

क्रिकेटच्या पंढरीत अर्थात #लॉर्डसवर विजयी झाल्यावर टी-शर्ट काढून केलेला जल्लोष आजही गोऱ्या लोकांना त्रासदायक ठरतोय; क्रिकेट मधून निवृत्त झाल्यावर नंतर आजही क्रिकेटला महत्वपूर्ण योगदान देत आहे; पश्चिम बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष होऊन निर्णय प्रक्रियेत सहभागी होत क्रिकेटच्या गरजा पूर्ण करण्यास प्रयत्नशील आहे आणि आमूलाग्र बदल घडवून आणतोय…!

सचिन सोबत सलामीला येणारा दादाचा 30 यार्ड भेडणारा कव्हर ड्राइव्ह असेल पुढे येत स्पिन गोलंदाजाला मारलेले उतुंग षटकार असतील आजही डोळ्यासमोर येतात आजही जेव्हा ते पाहू वाटतात तेंव्हा खरंच मनाला आनंद देतात.

दादाने केलेल्या खेळातील दादागिरीचे अनेक किस्से आजपर्यंत ऐकत आलोय आणि त्याबद्दल ऐकत राहायला मला नेहमीच आवडत’; मनात तेच ओठावर मग बोलणं कडू असलं तरी चालेल पण ते बोलणारच हाच त्याचा स्वभावगुण; त्यामुळेच त्याने वेळोवेळी आपल्या कडक भाष्याने सगळ्यांना विचार करायला भाग पाडले…!

अशा निर्णयशील कर्तबगार कदाचित उद्याच्या राजकारण्याला अर्थात #सौरभ_गांगुलीला (आपल्या लाडक्या दादास) वाढदिवसाच्या आपल्या अफाट लोकप्रियतेइतक्या खुप शुभेच्छा..💐🎂🔥💞

Born_to_Lead..!!💪💪

ग्लोबल न्युज नेटवर्क: